पूजा बेदीची लेक अलायाने केली नाकाची सर्जरी?, याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:58 PM2021-05-05T18:58:14+5:302021-05-05T18:58:57+5:30

अभिनेता सैफ अली खानची ऑनस्क्रीन लेक अलाया फर्निचरवाला लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

Pooja Bedi underwent nose surgery by Lake Alaya ?, the actress revealed | पूजा बेदीची लेक अलायाने केली नाकाची सर्जरी?, याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

पूजा बेदीची लेक अलायाने केली नाकाची सर्जरी?, याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

Next

अभिनेता सैफ अली खानची ऑनस्क्रीन लेक अलाया फर्निचरवाला लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. अलाया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि एका पेक्षा एक दमदार फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच तिने एका मुलाखतीत नाकावर सर्जरी करायची असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप तिने सर्जरी केलेली नाही आणि ती भविष्यात करण्याची शक्यता कमीच आहे.

अलाया फर्निचरवालाने आपल्याला नाकावर सर्जरी करायची असल्याचे सांगितले होते. पूर्वीचे आणि आताचे फोटो नीट बघितले तर नाकामध्ये फरक दिसेल. आपले नाक एका बाजूने थोडे वर उचलल्यासारखे होते. ते दुरुस्त करण्यासाठीच ही सर्जरी करायची होती. मात्र नंतर आपण हा निर्णय बदलला असे अलायाने सांगितले.


नाकावरची सर्जरी खूपच छोटी गोष्ट आहे. पण लोकांना ही गोष्ट लक्षात आली असती की नाही, हे सांगता आले नसते. पण ही सर्जरी करणे म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. नाकाच्या या आकाराकडे कोणाचेच लक्ष जाणार नाही, असे वाटल्यामुळे ही सर्जरी करण्याचा नाद सोडून दिल्याचे तिने सांगितले.

जवानी जानेमन या चित्रपटात अलायाने सैफ अली खानच्या ऑन स्क्रीन मुलीची भूमिका साकरली होती. या चित्रपटात तिचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील तिचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. आता प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात अलायाच्या आईच्या भूमिकेत आपल्याला प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूला पाहायला मिळाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pooja Bedi underwent nose surgery by Lake Alaya ?, the actress revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app