म्हणून १५ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पंतप्रधान मोदींच्या बायोपिक, हे आहे त्यामागचे खरे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 08:29 PM2020-10-12T20:29:49+5:302020-10-12T20:34:09+5:30

 गेल्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा 24 तारखेला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मोदींच्या जीवनातील विविध टप्पे सिनेमात दाखवण्यात आले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातील पंतप्रधान मोदींची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉयने साकारली आहे.

PM Narendra Modi biopic starring Vivek Oberoi to re-release in cinema halls on Oct 15 | म्हणून १५ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पंतप्रधान मोदींच्या बायोपिक, हे आहे त्यामागचे खरे कारण

म्हणून १५ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पंतप्रधान मोदींच्या बायोपिक, हे आहे त्यामागचे खरे कारण

googlenewsNext

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनंतर चित्रपटगृहात कोणकोणते सिनेमा प्रदर्शित होणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.चित्रपट समीक्षण तरण आदर्शने सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. शेअर केलेल्या पोस्टरवर प्रदर्शनाची तारिख १५ ऑक्टोबर देण्यात आली आहे.  

त्यामुळे लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला सिनमा हा मोंदीचा असणार असल्याचे बोलले जात आहे.  गेल्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा 24 तारखेला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मोदींच्या जीवनातील विविध टप्पे सिनेमात दाखवण्यात आले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातील पंतप्रधान मोदींची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉयने साकारली आहे.


पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात मोदींच्या जीवनातील अशाच काही माहित नसलेल्या गोष्टी पहिल्यांदाच सिनेमाच्या माध्यमातून जगासमोर आल्या होत्या. मोदींच्या जीवनातील विविध लूक साकारण्यासाठी विवेक बरीच मेहनत घेतली होती. यासाठी तो अडीच वाजताच उठायचा आणि मेकअपची तयारी सुरू करायचा. 

जवळपास सात ते आठ तासाचा कालावधी त्याला मेकअपसाठी लागायचा. त्यानंतर सकाळी ८ वाजता बरोबर तो शूटिंगसाठी सेटवर हजर असायचा. प्रोस्थेटिक मेकअपमुळे शुटिंग दरम्यान विवेकला काहीच खाता यायचे नाही.जे काही खायचे तेफक्त द्रव्यरुपातलं खाणं विवेकने खायचा. सेटवर विवेक मोदींच्या भूमिकेत इतका शिरलेला असायचा की,त्याचं वागणं बोलणं, वावर सारं काही मोदीसारखंच असायचे.

विवेकचं आपल्या काम, भूमिकेवरील निष्ठा पाहून सेटवरील सारेच अवाक झाले होते. या चित्रपटात मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री, २०१४मधील निवडणुका ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवासही दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात विविध दमदार राजकीय व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहेत. अभिनेता मनोज जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. 'मेरी कॉम' आणि 'सरबजीत' चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार पंतप्रधान मोदींवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


 

 

Web Title: PM Narendra Modi biopic starring Vivek Oberoi to re-release in cinema halls on Oct 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.