बॉलिवूडचा दबंग खान सलमान, सैफ अली खान आणि करिश्मा कपूर यांचा हम साथ साथ है चित्रपट तुमच्या लक्षात असेल ना... या चित्रपटात सलमानला मामा मामा बोलणारी छोटी मुलगी आठवतेय ना. या मुलीनं या चित्रपटात राधिकाची भूमिका साकारली आहे. आता ही मुलगी खूप मोठी झाली असून आता ती खूप ग्लॅमरस व बोल्ड दिसते. या मुलीचं नाव आहे जोया अफरोज.

जोया अफरोजनं हम साथ साथ है चित्रपटाव्यतिरिक्त काही सिनेमात व मालिकामध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. तसेच काही चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली आहे.  

जोया २५ वर्षांची असून तिचा जन्म १० जानेवारी १९९४ साली उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये झाला आहे. तिचे शिक्षण आर एन शाह हायस्कूलमधून झालं असून पुढील शिक्षण मुंबईतील मिठीबाई कॉलेडमध्ये झालं आहे. जोया सुंदरतेसाठी खूप फेमस आहे. तिने कित्येक सौंदर्य स्पर्धेत किताब पटकावला आहे.


२०१३ साली पॉण्ड्स फेमिना मिस इंडिया इंदौरचा किताब तिने पटकावला आहे. तसेच पॉण्ड्स फेमिना मिस इंडियाची ती सेकंड रनरअप होती. 


जोया सर्वात आधी १९९८ साली मालिका कोरा कागजमध्ये बालकलाकार म्हणून झळकली होती. याशिवाय तिने जय माता दी, हम सात आठ है आणि सोन परी सारख्या नाटकातदेखील बालकलाकार म्हणून काम केलं आहे.


१९९९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट हम साथ साथ हैमध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली. तसेच संत ज्ञानेश्वर, कुछ ना कहो यासारख्या चित्रपटातही ती पहायला मिळाली.


२०१४ साली तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. एक्सपोझ सिनेमात ती हिमेश रेशमियासोबत झळकली.

 

या चित्रपटाव्यतिरिक्त तिने 'स्वीटी वेड्स एनआरआई' चित्रपटातही काम केलं आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pictures of “Hum Saath Saath Hain” Zoya Afroz then and now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.