peoples preventing children to play with renuka shahane due to divorce between her parents | लोक आपल्या मुलांना माझ्यापासून लांब राहायला सांगत...! रेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा

लोक आपल्या मुलांना माझ्यापासून लांब राहायला सांगत...! रेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा

ठळक मुद्दे‘हम आपके है कौन’मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाली.

मुलांना प्रेम हवे असते. आईबाबा दोघेही हवे असतात. मात्र अनेक मुलांना हे सुख मिळत नाही. अभिनेत्री रेणुका शहाणे यापैकीच एक. रेणुका 8 वर्षांची असताना तिचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झालेत. रेणुकाला आजही हे दु:ख बोचते. अलीकडे तिने हे दु:ख बोलून दाखवले. पालकांच्या घटस्फोटाचा लहान मुलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होतो. मी सुद्धा हे भोगलेय,असे ती म्हणाली.

नेटफ्लिक्सच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये रेणुका यावर बोलली. ती म्हणाली, ‘ मी 8 वर्षांची होते, तेव्हा माझे आईवडिल विभक्त झालेत. त्या लहान वयात मी खूप काही भोगलेय. अनेक लोक त्यांच्या मुलांना माझ्यासोबत खेळण्यापासून रोखत. कारण माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. तिच्यासोबत खेळू नका, ती तुटलेल्या कुटुंबातून आली आहे, असे ते आपल्या मुलांना सांगत. माझ्यासोबत त्यांची मुलं खेळली तर त्यांचे कुटुंबही तुटेल, असे त्यांना वाटायचे.’

रेणूका शहाणे एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली दिग्दर्शक आहे. तिने ‘रिटा’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. नुकताच तिने दिग्दर्शित केलेला काजोल स्टारर ‘त्रिभंगा’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. यात चित्रपटात काजोलने एका ओडिशी डान्सरची भूमिका साकारली आहे. तिच्याशिवाय यात तन्वी आजमी व मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहेत.  
 ‘हम आपके है कौन’मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाली. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे  ‘हम आपके है कौन’ नंतर ‘बकेट लिस्ट’ या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: peoples preventing children to play with renuka shahane due to divorce between her parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.