Payal Ghosh targets Anurag Kashyap supporters says look like they have already committed their mother, sister, wife, daughter into this business | अनुराग कश्यपच्या सपोर्ट्सवर पायल घोषने साधला निशाणा, म्हणाली -

अनुराग कश्यपच्या सपोर्ट्सवर पायल घोषने साधला निशाणा, म्हणाली -

पायल घोषने पुन्हा एकदा अनुराग कश्यपला लैंगिक शोषणाच्या केसप्रकरणी सपोर्ट करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पायलने ट्विट करत लिहिले की, 'जे लोक अनुराग कश्यपला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना बघून असं वाटत की, जसे त्यांनी त्यांची आई, बहीण, पत्नी आणि मुलींना याच धंद्यात उतरवलं आहे आणि त्याला वाटतं की, बॉलिवूडमध्ये हे कॉमन आहे'.

विवेक तिवारी नावाच्या एका ट्विटर यूजरने पायल घोषचं दोन वर्षांआधीच्या ट्विटा स्क्रीन शॉट शेअर करत तिच्यावर निशाणा साधला होता. तिवारीने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'ते ट्विट, जे पायल घोषने सहजपणे डिलीट केलं'. पायलने दोन वर्षांपूर्वी ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'इथे कुणी कुणाचा रेप करत नाही. ते तुमच्यावर चान्स मारण्याचा प्रयत्न करता. जर तुम्हाला जमत नसेल तर मागे हटा. इतका ड्रामा करण्याची गरज नाहीये'. (अभिनेत्री पायल घोषचा रामदास आठवलेंच्या रपब्लिकन पक्षात प्रवेश)

पायलचा अनुरागवर लैंगिक शोषणाचा आरोप

२२ सप्टेंबरला पायल घोषने अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता. तिने आरोप लावला की, अनुरागने २०१३ मध्ये वर्सोवामध्ये करी रोडच्या एका लोकेशनवर तिचं लैंगिक शोषण केलं होतं. ८ ऑक्टोबरला या प्रकरणी अनुराग कश्यपची साधारण ८ तास चौकशी झाली होती. त्याने पायलने लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. हे त्याच्या विरोधातील षडयंत्र असल्याचं त्याने सांगितलं होतं. (त्याला सर्व माहित होतं...! अनुराग कश्यपप्रकरणात पायल घोषनं घेतलं इरफान पठानचं नाव)

अनुराग करणार कायदेशीर कारवाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुराग कश्यप पायल घोष विरोधात लीगल अॅक्शन घेण्याच्या तयारीत आहे. असेही सांगितले जात आहे की, तो आतापर्यंत पुरावे जमा करत होता. ज्यात त्याला यश आलं आहे. रिपोर्ट्सनुसार जर पायल तिने लावलेले आरोप सिद्ध करू शकली नाही तर तिच्या अडचणी वाढू शकतात.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Payal Ghosh targets Anurag Kashyap supporters says look like they have already committed their mother, sister, wife, daughter into this business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.