anurag kashyap controversy payal ghosh talked to irfan pathan | त्याला सर्व माहित होतं...! अनुराग कश्यपप्रकरणात पायल घोषनं घेतलं इरफान पठानचं नाव

त्याला सर्व माहित होतं...! अनुराग कश्यपप्रकरणात पायल घोषनं घेतलं इरफान पठानचं नाव

ठळक मुद्दे2014 मध्ये अनुरागने घरी बोलवून गैरवर्तन केल्याचा पायलचा आरोप आहे.

दिग्दर्शक  अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करून चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोषने आता या प्रकरणात माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचे नाव घेतले आहे. अनुरागने केलेल्या गैरकृत्याबद्दल इरफान पठाणला मी सांगितले होते. पण आता तो या प्रकरणावर चकार शब्द  बोलायला तयार नाही, असा दावा पायलने केला आहे.
2014 मध्ये अनुरागने घरी बोलवून गैरवर्तन केल्याचा पायलचा आरोप आहे. याप्रकरणी अनुरागविरोधात तिने एफआयआर दाखल केला आहे. आता पायलने एक ट्वीट करत याप्रकरणात इरफान पठाणच्या नावाचा उल्लेख केला आहे.

 ‘ अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केल्याचे मी इरफान पठानला सांगितले नव्हते. मात्र अनुरागप्रकरणाबद्दल मी इरफानला खूप काही सांगितले होते. आता मात्र तो गप्प आहे. चांगला मित्र असल्याचा दावा तो करतो,’ असे पायलने म्हटले आहे.

‘इरफान पठाणला टॅग करण्याचा अर्थ हा नाही की, मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. पण मी त्याच्यासोबत रेपसोडून बाकी सर्व काही शेअर केले होते. या सगळ्या गोष्टी ज्या मी त्याला सांगितल्या, त्या तो सांगेल, असा मला विश्वास आहे,’ असे एका  ट्वीटमध्ये तिने लिहिले आहे.

पायलचा मोठा खुलासा

2014 चा एक किस्साही तिने सांगितला आहे. ती लिहिते, ‘2014 मध्ये होळीच्या एक दिवस आधी अनुरागने मला मॅसेज केला होता. मी त्याच्या घरी यावे, अशी त्याची इच्छा होती. त्यावेळी इरफान माझ्याच घरी होता. त्याच्याच समोर अनुरागचा मॅसेज आला होता. मात्र मी इरफानला मी विनीत जैनच्या घरी जातेय, असे सांगितले होते. आशा आहे, त्याला आठवत असेल.’

 

पायलने सांगितले त्या दिवसाची घटना

अलीकडे पायलने एक व्हिडीओ शेअर केला होता. पायलने या व्हिडीओत सांगितले की, 'मी मिस्टर कश्यपला फेसबुकच्या माध्यमातून ओळखत होते. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवले होते. मी गेले होते. त्यांनी मला घरी बोलवले मी तिथेही गेले. आमच्यात बोलणं झाले. जेवण केले आणि मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवले. तेव्हा ते ड्रिंक आणि स्मोक करत होते. वेगळाच वास येत होता. मला उलटीसारखं होत होते. मी विचारले सर हे काय आहे. तर त्यांनी सांगितले गांजा. मग ते मला दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेले. पायलने सांगितले की, अनुरागने कपडे काढले आणि जबरदस्ती करू लागले. जेव्हा मी नाही म्हणत होते तर त्यांनी XYZ ची नावे घेतली आणि ४००, ५०० मुलींची नावे घेऊन मला कन्विंस करू लागले. पायल म्हणाली की, ते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते.  

पायल घोषने मागितली रिचा चढ्ढाची माफी; न्यायालयाकडून मानहानीचा दावा निकाली

'एकटी लढत राहीन, पण सोडणार नाही'

त्यानंतर पायल म्हणाली की, जे काही झाले त्या विरोधात मी लढत आहे. मी एकटीच लढत आहे. कारण कुणीही साथ देत नाहीय.  इथे सगळे फेक लोक भरलेले आहेत. पण मी कुणालाही सोडणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढत राहीन. जे लोक माझ्यासोबत उभे आहेत आणि सपोर्ट करत आहे त्यांचे आभार.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anurag kashyap controversy payal ghosh talked to irfan pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.