Parineeti Chopra's 'Saina' to be released on digital platform soon | परिणीती चोप्राचा 'सायना' चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच होणार रिलीज

परिणीती चोप्राचा 'सायना' चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच होणार रिलीज

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट गेल्या महिन्यात सिनेमाघरात प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. हा चित्रपट सिनेमाघरात प्रदर्शित झाल्यानंतर आता 
डिजिटल माध्यमात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. २३ एप्रिलला चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

परिणीती चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे खूपच आनंदित आहे. यावर परिणीती म्हणाली की, ‘चित्रपटाच्या ग्लोबल डिजिटल प्रीमियरमुळे मी खूप उत्साही आहे. आता जगभरातील लोक ही कथा बघू शकणार आहे. बायोपिक चित्रपटांमध्ये काम करणे एक मोठे आव्हान असते हे मला समजले आहे आणि या चित्रपटात माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे सायनाचे पात्र साकारणे होते.

सायनाच्या आईची इच्छा असते की, सायना खूप मोठी बॅडमिंटनपटू व्हावी. सायनासुद्धा आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. पुढे जाऊन हे स्वप्न केवळ तिच्या आईचेच नाहीतर सायनाचेही होते. सायनाला आपल्या देशाकडून खेळायचे असते. यासाठी ती खूप कष्ट करते आणि त्यादरम्यान, तिच्या आयुष्यात बर्‍याच अडचणी येतात. यावर हा सर्व चित्रपटा आधारित आहे. यादरम्यान सायना कशापध्दतीने कष्ट घेते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

परिणीतीच्या अगोदर सायना चित्रपटात श्रद्धा कपूर भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. यानंतर परिणीती चोप्राची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parineeti Chopra's 'Saina' to be released on digital platform soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.