दीपिका पादुकोण आज बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. याच दीपिकाने 2015 मध्ये 'पीकू' बनून चाहत्यांची मनं जिंकली होती. या सिनेमासाठी दीपिकाने अनेक अॅवॉर्ड्सदेखील आपल्या नावावर केले होते. 'पीकू'मध्ये दीपिकाने अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमासाठी दीपिका मेकर्सची पहिली चॉईस नव्हती स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा मेकर्सची पहिली चॉईस होती.

नेहा धुपियाच्या शोमध्ये परिणीती चोप्राने काही महिन्यांपूर्वी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता की, दीपिकाच्या आधी ही भूमिका परिणीतीला ऑफर करण्यात आली होती. या भूमिकेसाठी नकार दिल्याचा तिला आजही पश्चाताप होत असल्याचे तिने सांगितले होते. पुढे ती म्हणाली, मी हा सिनेमा सोडला नव्हता पण मी कन्फ्युज होते, त्यावेळी मी दुसऱ्या सिनेमात काम करत होते आणि तो सिनेमा तयार झालाच नाही. त्यामुळे सगळं नुकसान माझंच झालं. 'पीकू' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली होती. इरफान खानसुद्धा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनी सिनेमाला पसंती दिलीय.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेकमध्ये परिणीती दिसणार आहे. द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची कथा २०१५ साली सर्वाधिक विक्री झालेल्या पॉला हॉकिन्सच्या पुस्तकावर आधारित असून यामध्ये एका घटस्फोटीत महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे. ती हॉलिवूडपटात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती साकारणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parineeti chopra was first choice of makers for piku

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.