बकवास करण्याआधी विचार करा...! ‘सायना’च्या ट्रोलिंगमुळे भडकले दिग्दर्शक अमोल गुप्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 12:12 PM2021-03-05T12:12:04+5:302021-03-05T12:14:38+5:30

एवढ्या कल्पक पोस्टरबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणे, हे दुर्दैवी आहे...; काय म्हणाले अमोल गुप्ते?

parineeti chopra film saina trolled for poster director amol gupte breaks his silence | बकवास करण्याआधी विचार करा...! ‘सायना’च्या ट्रोलिंगमुळे भडकले दिग्दर्शक अमोल गुप्ते

बकवास करण्याआधी विचार करा...! ‘सायना’च्या ट्रोलिंगमुळे भडकले दिग्दर्शक अमोल गुप्ते

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सायना’ हा चित्रपट 26 मार्च 2021 रोजी प्रदर्शित होईल. परिणीतीच्या अगोदर या चित्रपटात श्रद्धा कपूरची भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला.

अभिनेत्री परिणीती चोप्राचा ‘सायना’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हा सिनेमा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर बेतलेला आहे, हे नावावरून तुमच्या लक्षात आलेच असेल. कालपरवा या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आणि परिणीतीच्या या सिनेमाची नेटक-यांनी जबरदस्त खिल्ली उडवली. आता चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला आहे. काहीही बकवास करण्यापेक्षा आधी विचार करा, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
फेसबुकवर पोस्ट लिहित, अमोल गुप्ते यांनी ‘सायना’च्या पोस्टरवरून ट्रोल करणा-यांना फटकारले आहे.

काय म्हणाले अमोल गुप्ते?

‘पोस्टरवर डिजीटल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. टेनिसची सर्व्हिस वाटतेय, सायना सानिया बनलीये वगैरे वगैरे...जर सायना उडणारी शटल आहे, तर राष्ट्रीय रंगाच्या मनगटावरच्या बॅण्डसह मुलीचा हात सायनाच्या उंचीपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा असलेल्या भारतीय मुलीचा हात आहे. राहुल नंदाच्या एवढ्या कल्पक पोस्टरबाबत एवढ्या लगेच प्रतिक्रिया देण्यात येत आहे आणि मला त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणे, हे दुर्दैवी आहे. बकवास करण्याच्या आधी विचारच करत नाहीत. विचार करा,’ अशी फेसबूक पोस्ट अमोल गुप्ते यांनी लिहिली आहे.

काय आहे वाद

‘सायना’चित्रपट  बँडमिंटनपटू सायना नेहवालच्या  कारकिर्दीवर बेतलेला असल्यामुळे या खेळाशीच संबंधित असा शटल पोस्टरमध्ये दाखवण्यात आला आहे. सर्व्हिस देण्यापूर्वी शटल हवेत उडवतानाच्या क्षणांचा आधार घेत हे कलात्मक पद्धतीने हे पोस्टर साकारण्यात आले आहे. पण,हे पोस्टर पाहताच नेटक-यांनी ‘सायना’च्या क्रिएटीव्ह टीमला ट्रोल करणे सुरु केले होते. बॅडमिंटनमध्ये सर्व्हिस खालून होते आणि टेनिसमध्ये सर्व्हिस वरून होते, ही बाब नेटक-यांनी अधोरेखित केली होती. यावरून लोकांनी या पोस्टरला ट्रोल केले गेले. चित्रपटाचे मेकर्स सायना आणि सानिया यांच्यात गोंधळले असल्याचे म्हणत अनेकांनी या पोस्टरची खिल्ली उडवली होती.

टेक्नीक ही गलत है, पोस्टर बनानेवाले चाचा...!  ‘सायना’ चित्रपटामुळे परिणीती चोप्रा झाली ट्रोल

‘सायना’ हा चित्रपट 26 मार्च 2021 रोजी प्रदर्शित होईल. परिणीतीच्या अगोदर या चित्रपटात श्रद्धा कपूरची भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. यानंतर परिणीती चोप्राची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली.

Web Title: parineeti chopra film saina trolled for poster director amol gupte breaks his silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.