घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही...' या गाण्यात मयुरी  मोठ्या पडद्यावर दिसली होती. ९० च्या दशकात मयुरी कांगोने  बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पापा कहते है या चित्रपटातील घर से निकलते ही... हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात आपल्याला जुगल हंसराज आणि मयुरी कांगो यांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील मयुरीच्या अभिनयाचे कौतुक झाले नसले तरी तिच्या लूक्सची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. गेल्या काही वर्षांपासून मयुरी चित्रपटापासून दूर आहे. पण आता ती कुठे आहे आणि काय काम करत आहे हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसणार आहे.

मयुरी कांगो ही सध्या गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड आहे.  २००५ साली एमबीए करण्यासाठी  ती न्यूयॉर्कला गेली.शिक्षण घेत नोकरी करायला सुरुवात केेली.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूयॉर्क येथील एका अग्रणी ॲडव्हरटायझिंग एजन्सीमध्ये त्या काम करू लागली. करिअरमध्ये एक उंची गाठत मयुरी सध्या गूगलमध्ये इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहे.

मयुरीने केलेल्या चित्रपटांच्या यादीत 'होगी प्यार की जीत','पापा कहते है', 'जितेंगे हम' हे चित्रपट नक्कीच लक्षात राहण्यासारखे आहेत. तिने ऐकूण 16 सिनेमांमध्ये काम केलं. पण म्हणावं तसं यश तिला मिळालं नाही. सध्या मयुरी बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर  गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहे. 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Papa kehte hain actress mayuri kango now google industry head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.