ठळक मुद्दे 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला.

सुपरमॉडेल, अ‍ॅक्ट्रेस, टीव्ही होस्ट पद्मा लक्ष्मी तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड फोटो शेअर करण्याची एकही संधी पद्मा लक्ष्मी सोडत नाही. आता तिची तिच्या वयाबद्दलची पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. होय, एक बिकिनी फोटो शेअर करत, पद्मा लक्ष्मीने तिचे वय सांगितले आहे. Feelin’ fine at 49, असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे.


 इन्स्टाग्रामवर पद्माला एकूण 624 हजार लोक फॉलो करतात. त्याचबरोबर अभिनेत्री पद्मासुद्धा 1202 लोकांना फॉलो करते.  18 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात करणारी पद्मा लक्ष्मी 2018 मध्ये  एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. 


या फोटोशूटमध्ये तिने पिज्जा खाताना पोज दिली होती. स्पेनमध्ये कॅफेत बसलेली असताना एका मॉडेलिंग एजंटची तिच्याकडे नजर गेली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. विशेष म्हणजे पॅरिस, मिलान आणि न्यू यॉर्क या तीन महत्वाच्या शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी पद्मालक्ष्मी ही एकमेव भारतीय मॉडेल आहे.


2003मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती.  पण मॉडेलिंगमध्ये जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेल्या पद्मालक्ष्मीला अभिनय क्षेत्रात टीकाव लागला नाही. ‘बूम’आपटला आणि हा सिनेमा आपटल्यानंतर अमेरिकेला परत जाऊन पद्मालक्ष्मीने टीव्ही शोवर लक्ष केंद्रीत केले.


पद्मालक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. तिने आतापर्यंत पाककलेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिवाय  पद्माज पासपोर्ट  आणि  प्लॅनेट फूड  हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट केले आहेत.


  प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. त्यावेळी रश्दी 51 वर्षांचे होते तर लक्ष्मी केवळ 28 वर्षांची होती. पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.   

Web Title: padmalaxmi share bikini photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.