OMG! Shahid Kapoor walks out of awards show, refuses to perform after being denied Best Actor award | OMG! शाहिद कपूर भडकला, परफॉर्म न करताच निघून गेला!!
OMG! शाहिद कपूर भडकला, परफॉर्म न करताच निघून गेला!!

ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ या चित्रपटानंतर शाहिद ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे.

शाहिद कपूरने ‘कबीर सिंग’ या चित्रपटात साकारलेला ‘सनकी डॉक्टर’ आपण सर्वांनी पाहिलाच. हा चित्रपट आणि या चित्रपटातील शाहिदचा दमदार अभिनय चाहत्यांना इतका भावला की, या सिनेमाने 250 कोटींची कमाई केली. अशात या चित्रपटासाठी शाहिदला अवार्ड मिळणे सर्वांनाच अपेक्षित होते. अगदी शाहिदला सुद्धा. पण नुकत्याच पार पडलेल्या एका अवार्ड फंक्शनमध्ये आयोजकांनी ऐनवेळी फेरफार करत शाहिदला बेस्ट अ‍ॅक्टरचा अवार्ड नाकारला. मग काय, शाहिद नाराज झाला आणि ऐनवेळी परफॉर्मन्स करण्यास नकार देत, इव्हेंटमधून निघून गेला.


होय, पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या अवार्ड फंक्शनमध्ये शाहिद परफॉर्म करणार होता. ‘कबीर सिंग’साठी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवार्ड मिळणार असल्याचे आयोजकांनी त्याला सांगितले होते. पण ऐनवेळी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवार्ड त्याच्याऐवजी ‘गली बॉय’साठी रणवीर सिंगला दिला गेला. हे पाहून शाहिदचा पारा चढला  आणि त्याने तडक शो सोडण्याचा निर्णय घेतला. शोमध्ये परफॉर्म करण्यासही त्याने नकार दिला.  
शाहिदने ऐनवेळी परफॉर्म करण्यास नकार दिल्याने आयोजकांनी पंचाईत झाली. शाहिदच्या जागेवर कोण परफॉर्म करणार, असा प्रश्न त्यांना पडला. अखेर वरूण धवनला फोन केला गेला आणि त्याने शाहिदच्या जागी परफॉर्म केला.


दरम्यान शाहिदच्या जवळच्या सूत्रांनी या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. शाहिद दिलेला शब्द पाळतो. त्यामुळेच डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला देऊनही शाहिद त्याच्या कमिटमेंट पूर्ण करतोय. कुठल्याही नाराजीमुळे नाही तर प्रकृती बिघडल्याने तो शोमधून निघून गेला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
‘कबीर सिंग’ या चित्रपटानंतर शाहिद ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपटही साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे.

Web Title: OMG! Shahid Kapoor walks out of awards show, refuses to perform after being denied Best Actor award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.