OMG! ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या दिवशी मॉडेलने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 11:19 AM2020-04-21T11:19:15+5:302020-04-21T11:19:49+5:30

अभिषेकच्या लग्नाच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे बच्चन कुटुंब हैराण झाले होते.

OMG! On the day of Aishwarya-Abhishek Bachchan's wedding, the model attempted suicide TJL | OMG! ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या दिवशी मॉडेलने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

OMG! ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या दिवशी मॉडेलने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला नुकतेच 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांना त्यांचे चाहते लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बच्चन फॅमिलीनेदेखील हा क्षण सेलिब्रेट केला. मात्र अभिषेकच्या लग्नाच्या दिवशी बच्चन कुटुंब अडचणीत आले होते. कारण मॉडेल जान्हवी कपूरने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे सगळेच हैराण झाले होते.


अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचं लग्न खूप दिमाखदार पद्धतीने करण्यात आले होते. लग्नाच्या दिवशी जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब आनंदात होते आणि अभिषेक वराच्या गेटअपमध्ये तयार होता. त्यावेळी एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले होते.

खरेतर लग्नाच्या दिवशी मॉडेल जान्हवीने अभिषेकसोबत लग्न झाल्याचे सांगत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार मॉडेल जान्हवी कपूरने अभिषेक बच्चनवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.


अभिषेकच्या 'दस' या सिनेमात जान्हवी एक बॅकग्राऊंड डान्सर होती. तेव्हा हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा तिने केला होता. मात्र, लग्नाचे तिच्याकडे काहीच पुरावे नव्हते. जान्हवीच्या या नाट्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब हादरले होते. नंतर तिला अटकसुद्धा करण्यात आली होती.


अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'रावण', 'कुछ ना कहो', 'गुरू' यांसारख्या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. या दोघांचा 'गुरू' हा चित्रपट हिट ठरला होता.

Web Title: OMG! On the day of Aishwarya-Abhishek Bachchan's wedding, the model attempted suicide TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.