अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या ती दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. तिथले तिचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या सुट्टीत तिने क्रिकेट खेळण्याचा आनंददेखील लुटला. या सुट्टीतील एका गोष्टीमुळे ती खूप चर्चेत आली आहे. ही गोष्ट म्हणजे तिने वीस हजार फूट उंचीवरून (स्काय डाइव्ह) उडी मारण्याचा अनुभव घेतला आहे. तिने स्काय डाइव्हचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांना खूप पसंती मिळते आहे.

उर्वशी रौतेला हिने सोशल मीडियावर स्काय डाइव्हिंगचे फोटो शेअर करीत लिहिले की, हॅपीनेसचे आणखी एक वर्ष, आनंदाचे आणखी एक वर्ष, स्काय डायव्हिंगचे आणखी एक वर्ष.’

 उर्वशी रौतेला नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंवरून चर्चेत असते. उर्वशीचा बोल्ड अंदाज तिच्या फॅन्सना खूप आवडतो. उर्वशी रौतेलानं बॉलिवूडमध्ये चित्रपट ‘द सिंह साहब ग्रेट’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती सनम रेमध्ये पहायला मिळाली. उर्वशीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग्स केले आहेत.


वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर उर्वशी रौतेला लवकरच जॉन अब्राहम सोबत चित्रपट ‘पागलपंती’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात उर्वशी आणि जॉन सोबतच इलियाना डिक्रूज, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, कृती खरबंदा आणि सौरभ शुक्लासुद्धा मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीज बझ्मी करणार आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG ...! Bollywood actress jumped 20,000 feet in Dubai, see this photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.