oh my god 2 akshay kumar and paresh rawal join hands again | ठरलं! अक्षय कुमार-परेश रावल यांच्या ‘ओह माय गॉड’चा सीक्वल येणार!!

ठरलं! अक्षय कुमार-परेश रावल यांच्या ‘ओह माय गॉड’चा सीक्वल येणार!!

ठळक मुद्दे‘ओह माय गॉड’ हा सिनेमा 2012 साली रिलीज झाला होता. कांजी विरूद्ध कांजी या गुजराती नाटकावर आधारित हा सिनेमा होता.  

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या बॅक टू बॅक सिनेमांमुळे चर्चेत आहे. आता अक्षय आणखी एक सिनेमा घेऊन येतोय. या सिनेमाचे नाव ऐकल्यानंतर चाहते एक्ससाईटेड होतील हे नक्की. तर या सिनेमाचे नाव आहे, ‘ओह माय गॉड 2’. 
होय, 2012 मध्ये रिलीज झालेल्या आणि तुफान गाजलेल्या ‘ओह माय गॉड’ या सिनेमाचा सीक्चल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, या सीक्वलची जोरदार तयारी सुरु आहे. लवकरच हा सिनेमा फ्लोरवर येणार आहे. अक्षय कुमार व निर्माता अश्विनी वर्दे हे दोघे मिळून ‘ओह माय गॉड 2’ प्रोड्यूस करणार आहेत.

सूत्रांचे मानाल तर अश्विनी, अक्षय व परेश रावल दीर्घकाळापासून ‘ओह माय गॉड 2’ची प्लॅनिंग करत होते. मात्र चांगली कल्पना सुचत नव्हती. मात्र आता एक धम्माल कल्पना सुचली असून यावर आधारित ‘ओह माय गॉड 2’ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडे अश्विनी व अक्षय यांची दिल्लीत भेट झाली. यावेळी ‘ओह माय गॉड 2’चे प्री-प्रॉडक्शन, कास्ट व पुढच्या तयारीसंदर्भात चर्चा झाल्याचे कळते.

चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे आणि 2021 च्या उन्हाळ्यात या सिनेमाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे.
‘ओह माय गॉड’ हा सिनेमा 2012 साली रिलीज झाला होता. कांजी विरूद्ध कांजी या गुजराती नाटकावर आधारित हा सिनेमा होता.   या सिनेमात देवभोळेपणावर आणि अंधश्रद्धाळूंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. त्यामुळे हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांना भलताच भावला होता. सिनेमात  देवाच्या नावाचा वापर करून पैसे उकळणा-या स्वामी, बाबा लोकांचा खरपूस समाचार घेतल्यामुळे ब-याच धार्मिक संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला होता. यामुळे या सिनेमाने काही प्रमाणात वादही ओढवून घेतले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: oh my god 2 akshay kumar and paresh rawal join hands again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.