Not Aishwarya Rai, Amitabh Bachchan Hails Kangana Ranaut As 'Number One' Actress On KBC | अमिताभ बच्चन यांच्यामते ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1
अमिताभ बच्चन यांच्यामते ऐश्वर्या राय नव्हे तर ही अभिनेत्री आहे बॉलिवूडमध्ये नंबर 1

ठळक मुद्देअमिताभ म्हणाले, कंगना ही खूप सुंदर दिसण्यासोबतच एक खूप चांगली अभिनेत्री आहे. तिला तिच्या अभिनयासाठी फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राष्ट्रीय पुरस्काराने देखील तिला गौरवण्यात आले आहे. ती सध्या नंबर एकची अभिनेत्री असून ती खूपच प्रसिद्ध आहे. 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सगळेच सिझन चांगलेच गाजले आहेत. या कार्यक्रमाचा अकरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील तसेच भारतातील विविध भागात राहाणारे लोक हजेरी लावत असतात.

या कार्यक्रमातील स्पर्धक सात करोड रुपये जिंकण्याच्या आशेने या कार्यक्रमात हजेरी लावतात. त्यामुळे या कार्यक्रमात येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांसाठी हा खेळ खूपच महत्त्वाचा असतो. पण हा खेळ सोडून अनेकवेळा स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी कार्यक्रमात गप्पा मारताना देखील दिसतात. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर अनेकवेळा अमिताभ त्या उत्तराविषयी अधिक माहिती देताना दिसतात. या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात एक व्हिडिओ स्पर्धकाला ऐकवण्यात आला आणि हा आवाज कोणाचा आहे याबाबत विचारण्यात आले आणि अमिषा पटेल, कंगना रणौत, प्रीती झिंटा, क्रीती सॅनन असे पर्याय देण्यात आले होते. या व्हिडिओत ती अभिनेत्री बोलत होती की, माझे आजोबा एक खूप मोठे राजकीय पुढारी होते. मला देखील अनेकवेळा राजकारणाच्या ऑफर आल्या आहेत. मला राजकारणात जायचे नसल्याने मी या ऑफर कधीच स्वीकारल्या नाहीत. मला राजकारणात जायचेच नाहीये. मला चित्रपटसृष्टीतच यायचे होते. हेच माझे ध्येय होते.

या प्रश्नाचे उत्तर कंगना असे स्पर्धकाने दिल्यानंतर अमिताभ यांनी तिचे कौतुक केले. ते म्हणाले, कंगना ही खूप सुंदर दिसण्यासोबतच एक खूप चांगली अभिनेत्री आहे. तिला तिच्या अभिनयासाठी फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राष्ट्रीय पुरस्काराने देखील तिला गौरवण्यात आले आहे. ती सध्या नंबर एकची अभिनेत्री असून ती खूपच प्रसिद्ध आहे. 
 

Web Title: Not Aishwarya Rai, Amitabh Bachchan Hails Kangana Ranaut As 'Number One' Actress On KBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.