आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. नोरा पॅरिसमधील ओलंपिया स्टेडियममध्ये परफॉर्मन्स सादर करणार आहे. ओलंपिया स्टेडियममध्ये आपली कला सादर करणारी नोरा पहिली भारतीय आहे. याआधी मडोना, द बीटल्स, जेनेट जॅक्सन, पिंक फ्लोयड  जगभरातील या प्रतिष्ठित कलाकारांनी याठिकाणी आपली कला सादर केली आहे. याशिवाय अनेक हॉलिवूडच्या कलाकारांनी देखील आजवर इथं परफॉर्म केले आहे. नोरा एकमेव बॉलिवूडच्या अभिनेत्री आहे जिला ही संधी मिळाली आहे.  


नोरा याठिकाणी दिलबर, साकी साकी, कमरिया, एक तो कम जिंदगानीसारख्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. नोराचा परफॉर्मन्स आज पॅरिसमध्ये होणार आहे. 


स्ट्रीट डान्सर चित्रपटातील नोराची भूमिका महत्त्वपूर्ण असून ती डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने खूप स्ट्राँग व कॉन्फिडंस असणाऱ्या तरूणीची भूमिका यात साकारली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे तिचा लूक डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे नोराच्या पात्राला एक स्वॅग व एडिड्युड प्राप्त झाला आहे. नोरा फतेहीला बालपणापासून डान्सवर आधारीत चित्रपटात काम करायचं होतं आणि अखेर तिचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. तिने या चित्रपटातील भूमिकेसाठी खूप मेहनत देखील घेतली आहे. तिने या चित्रपटातील लूकसाठी स्वतः जातीनं लक्ष दिलं आहे. 

Web Title: Nora fatehi will perform in paris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.