Nora fatehi was not a good dancer in school and was bullied for it actress reveals | या कारणामुळे नोराची शाळेत उडवली जायची खिल्ली, स्वत: नोराने दिली कबुली

या कारणामुळे नोराची शाळेत उडवली जायची खिल्ली, स्वत: नोराने दिली कबुली

आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रीची शाळेत असताना थट्टा केली जायची कारण तिला त्यावेळी डान्स करायला यायचा नाही. मात्र आज डान्ससाठी नोरा प्रत्येक निर्मात्याची पहिली चॉईस बनली आहे. नुकतीच नोरा विकी कौशलसोबत ‘पछताओगे’ गाण्यामध्ये सुद्धा दिसली होती. 


राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री म्हणाली, शाळेत असताना माझ्या डान्सवर लोक हसायचे कारण मला डान्स करता यायचा नाही. नोरा कॅनडामध्ये लहानची मोठी झाली आहे. पुढे ती म्हणाली, ज्यांना चांगला डान्स यायचा अशी मुलींशी मला मैत्री करायची असायची. मी त्यांची नकल करायचे मात्र त्यांनी मला नेहमीच नाकारले. मला सांगण्यात यायचे की माझा डान्स त्यांच्या लेव्हलचा नसायचा. हा माझ्यासाठी एक सन्मान आहे की मला एक चांगले डान्सर समजले जाते.   


'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या सिनेमातून डेब्यू केलेल्या नोराने साऊथनमधील अनेक सिनेमातील गाण्यावर परफॉर्म केले आहे. 
नोराच्या 'पछताओगे' या गाण्याबाबत बोलायचे झाले तर हे गाणं  अर्जित सिंगने गायले  आहे आणि दिग्दर्शन अरविंद खैरानेनं केलं आहे. या संपूर्ण गाण्याचं शूटिंग शिमल्यात झालं आहे.'पछताओगे'च्या सक्सेस पार्टीत टी-सीरिजचे मॅनेजिंग डिरेक्टर भूषण कुमारदेखील पहायला मिळाले. भूषण कुमार यांनी या सक्सेससाठी विकी व नोराची प्रशंसा केली. त्यांनी सांगितलं की, चांगल्या कलाकारांसोबत टीसीरिज यापुढेही म्युझिक अल्बम बनवित राहणार आहे.

Web Title: Nora fatehi was not a good dancer in school and was bullied for it actress reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.