आपल्या डान्सच्या माध्यमातून नोरा फतेहीने रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सत्यमेव जयतेमधील 'दिलबर' गाण्यामुळे घराघरात पोहोचली आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रीची शाळेत असताना थट्टा केली जायची कारण तिला त्यावेळी डान्स करायला यायचा नाही. मात्र आज डान्ससाठी नोरा प्रत्येक निर्मात्याची पहिली चॉईस बनली आहे. नुकतीच नोरा विकी कौशलसोबत ‘पछताओगे’ गाण्यामध्ये सुद्धा दिसली होती. आता नोरा एका नवीन गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

नोरा फतेहीच्या नव्या गाण्याचे बोल आहेत 'एक तो कम जिंदगानी'.  नोराने हे गाणं सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया आणि रितेश देशमुख यांचा आगामी सिनेमा मरजावांसाठी शूट केलं आहे. या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला होता. त्यानंतर आता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं रिलीज झाल्याची माहिती मरजावां चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आहे. त्याने म्हटलं की, चाहत्यांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी आली आहे नोरा फतेही.


यामध्ये नोरा फतेहीने आपल्या बोल्ड लूकने फॅन्सना घायाळ केले आहे. व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नोरा खूपच हॉट दिसते आहेत. या गाण्यात नोरा बेली डान्सच्या स्टेप्स करताना देखील दिसते आहे. हे गाणं नेहा कक्कड आणि यश नारवेकर यांनी गायलं आहे.


मिलाप झवेरी दिग्दर्शित मरजावां हा सिनेमा ८ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ, रितेश, तारा यांच्याव्यतिरिक्त रकुल प्रीत सिंगदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मरजावां या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ मल्होत्रा व तारा सुतारिया ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच रितेश बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nora Fatehi turns up the heat with Marjaavaan's new song 'Ek Toh Kum Zindagani'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.