Nora fatehi shared her sizzling dance practice video before filmfare awards | Video : घाबरली रे घाबरली, नोरा फतेही घाबरली...! स्टेजवर डान्स करताना उडाला तिच्या चेहऱ्यावरचा रंग!

Video : घाबरली रे घाबरली, नोरा फतेही घाबरली...! स्टेजवर डान्स करताना उडाला तिच्या चेहऱ्यावरचा रंग!

नोरा फतेही नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे.सारा अली खान नंतर आता नोरा फतेहीचा डान्स प्रॅक्टिस व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये नोराला इतर डान्सर हवेत उचलताना दिसतायेत.  हे करताना नोराच्या चेहर्‍याचा रंग काही वेळेसाठी उडून गेलेला दिसतोय. मात्र, नंतर नोरा हसताना दिसत आहे.

नोरा फतेही  फिल्मफेअर पुरस्कारांसाठी ही डान्स प्रॅक्टिस करत होती. त्याचाच व्हिडिओ नोराने शेअर केला. या व्हिडिओमध्ये, स्टेजवर डान्स करणाऱ्या नोराला तिच्या  बरोबरचे डान्सर डावीकडून उजवीकडे आणि नंतर उजवीकडून डावीकडे बाऊन्स करताना दिसत आहे.  काही काळासाठी नोराचा चेहरा पाहताना असे दिसते की ती घाबरली आहे, परंतु पुढच्या क्षणी ती हसताना दिसत आहे.

नुकतेच विमल इलायची फिल्मफेअर पुरस्कार २०२१ आयोजित केले होते.  यावेळी नोरासह अनेक चित्रपट सेलिब्रिटींनी परफॉर्म केले. नोराने यापूर्वी अवॉर्ड शोचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती परफॉर्म करताना दिसली होती. नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात दिलबर हे आयटम साँग करून बॉलिवुडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने डांस शोमध्येही भाग घेतला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nora fatehi shared her sizzling dance practice video before filmfare awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.