​फिल्मफेअर पुरस्काराची नामांकने वादात! राजकुमार रावला डावलल्याने सोशल मीडियावर संताप !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 10:09 AM2018-01-19T10:09:08+5:302018-01-19T15:39:08+5:30

यंदाच्या ६३ व्या फिल्मफेअर पुरस्काराची नामांकने जाहिर झाली आहेत. पण नामांकने जाहिर होताच , उद्या २० जानेवारीला मुंबईत रंगणारा ...

Nomination controversy for the Filmfare Award! Rajkumar Raavla Due to social media anger! | ​फिल्मफेअर पुरस्काराची नामांकने वादात! राजकुमार रावला डावलल्याने सोशल मीडियावर संताप !!

​फिल्मफेअर पुरस्काराची नामांकने वादात! राजकुमार रावला डावलल्याने सोशल मीडियावर संताप !!

googlenewsNext
दाच्या ६३ व्या फिल्मफेअर पुरस्काराची नामांकने जाहिर झाली आहेत. पण नामांकने जाहिर होताच , उद्या २० जानेवारीला मुंबईत रंगणारा हा सोहळा वादात सापडला आहे. होय, भारतीय सिनेमातील सर्वोत्तम प्रतिभेला  गौरविणा-या फिल्मफेअरला लोकांनी आडव्या हातांनी घेतले आहे.
 होय, ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठीच्या नामांकनात यंदाही अनेक प्रकारचा गोंधळ पाहायला मिळतोय. उदाहरणार्थ सर्वोत्तम अभिनेत्याच्या श्रेणीत राजकुमार राव (न्यूटन, ट्रॅप्ड) या अभिनेत्याचे नाव सामील करण्यास कदाचित फिल्मफेअरला विसर पडलाय. सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटालाही कुठल्याही श्रेणीत नामांकने दिले गेलेले नाही. याऊलट अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटाला बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट फिल्म अशा सगळ्यात श्रेणीत नामांकन मिळले आहे. लोकांनी नेमक्या याच कारणावरून फिल्मफेअरला लक्ष्य केले आहे. विशेषत: सर्वोत्तम अभिनेत्याच्या नामांकन यादीत राजकुमारचे नाव नसणे लोकांना अधिक खटकले आहे.



राजकुमारचे यंदा आलेले ‘न्यूटन’ आणि ‘ट्रॅप्ड’ हे दोन्ही सिनेमे जगभरात वाखाणण्यात आलेत. ‘न्यूटन’ तर भारताच्या वतीने आॅस्करसाठीही पाठवण्यात आला. यातील अभिनयासाठी राजकुमारचे वारेमाप कौतुक झाले. पण इतके असूनही फिल्मफेअरच्या सर्वोत्तम अभिनेत्याच्या नामांकनातून मात्र राजकुमारला वगळले गेलेयं. (‘बरेली की बर्फी’साठी राजकुमारला सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन दिले गेलेय) यावरून लोकांनी फिल्मफेअरवर टीका केली आहे. सलमानच्या चाहत्यांनीही फिल्मफेअरला धारेवर धरले. फिल्मफेअर हेच करणार, हे माहित होते. पण असल्या फेक अवार्डची चिंता नाही, असे एका युजरने लिहिले.  
सर्वोत्तम अभिनेत्यामध्ये अक्षय कुमार ( टॉयलेट एक प्रेम कथा), आयुष्मान खुराना (शुभ मंगल सावधान), शाहरूख खान ( रईस), ऋतिक रोशन (काबिल), इरफान खान (हिंदी मीडियम), वरूण धवन (बद्रीनाथ की दुल्हनिया) यांना नामांकने मिळाली आहेत. तर सर्वोत्तम अभिनेत्रीच्या नामांकन यादीत आलिया भट्ट (बद्रीनाथ की दुल्हनिया), भूमि पेडनेकर (शुभ मंगल सावधान), सबा कमर ( हिंदी मीडियम), श्रीदेवी  (मॉम), विद्या बालन (तुम्हारी सुलु ) ,जायरा वसीम (सीक्रेट सुपरस्टार) यांना स्थान मिळाले आहे.

Web Title: Nomination controversy for the Filmfare Award! Rajkumar Raavla Due to social media anger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.