No clean chit to Deepika Padukone, Sara Ali Khan and Shraddha Kapoor says NCB | संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

NCB म्हणजेच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स केसमध्ये नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंहला समन्स पाठवला होता. गेल्या आठवड्यात त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. दरम्यान अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे.  पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या बातम्यांमध्ये सांगण्यात आले आहे की, ज्यांची चौकशी करण्यात आली होती त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. पण यात काहीच तथ्य नाही. एनसीबीने शनिवारी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि करिश्मा यांची चौकशी केली होती.

साराने दिली होती सुशांतसोबतच्या रिलेशनशिपची माहिती

सारा अली खानने सुशांतसोबत 'केदारनाथ' सिनेमात काम केलं होतं. तिची ५ तास चौकशी करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराने यावेळी सुशांत आणि तिच्या रिलेशनशिपबाबत सांगितलं. साराने हेही सांगितले की, सुशांत ड्रग्स घेत होता. तसेच सुशांत रिलेशनशिपमध्ये लॉयल नव्हता असंही साराने सांगितल्याची माहिती आहे. त्यासोबत ती स्वत: ड्रग्स घेत नसल्याचं तिने सांगितलं.

दीपिकाने सांगितले होते सिगारेटचे कोड वर्ड्स

चौकशीदरम्यान दीपिकाने ती ड्रग्स घेत नसल्याचं सांगितलं. दीपिकाला जेव्हा चॅटबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, मित्रांमध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या सिगारेटसाठी कोड वर्ड्स दिले होते. तेच दीपिकाच्या मॅनेजरने सुद्धा असाच जबाब दिला. रिपोर्ट्स आहेत की, सर्वांचे जबाब इतके सारखे होते की, एनसीबी अधिकारीही हैराण झालेत.

श्रद्धा म्हणाली सुशांत ड्रग्स घेत होता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरनेही सुशांत हा ड्रग्स घेत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, ती 'छिछोरे' च्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती. पण तिथे ड्रग्स नाही तर ड्रिंक्स सर्व्ह केले होते. श्रद्धाने सांगितले की, तिने कधीच ड्रग्स घेतलं नाही. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: No clean chit to Deepika Padukone, Sara Ali Khan and Shraddha Kapoor says NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.