ठळक मुद्देराखी यांनी गुलजार यांना सुचित्रा यांच्या रूममधून बाहेर पडताना पाहिले आणि गुलजार तिथे का गेले होते हे राखी त्यांना सतत विचारत होत्या. पण या कारणामुळे राखी आणि गुलजार यांच्यात त्या दिवशी प्रचंड भांडणं झाली.

राखी आणि गुलजार यांनी कधीही घटस्फोट घेतला नसला तरी ते अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत. राखी या सत्तरीच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्री होत्या तर गुलजार यांनी त्यांच्या गाण्यांद्वारे लोकांची मनं जिंकली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट देखील गाजले होते. राखी आणि गुलजार यांचे लग्न होण्याआधी राखी यांचे लग्न अजय बिस्वास यांच्यासोबत झाले होते. अजय यांनी पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 

अजय आणि राखी यांचे लग्नाच्या दोनच वर्षांत बिनसले आणि त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान गुलजार राखीच्या सौंदर्याच्या तर राखी गुलजार यांच्या लेखणीच्या प्रेमात पडले होते. १९७३ ला राखी आणि गुलजार यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. गुलजार यांनी लग्नाच्याआधीच राखी यांना स्पष्ट केले होते की, त्यांनी चित्रपटात काम करणे गुलजार यांना आवडणार नाही. पण याच कारणामुळे राखी आणि गुलजार यांच्यात भांडणं झाली आणि त्यांची मुलगी मेघनाच्या जन्मानंतर वर्षभरातच त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. 

बॉलिवूडशादीजने दिलेल्या वृत्तानुसार, राखी लग्नानंतर चित्रपटात काम करणार नाहीत हे राखी यांनी मान्य केले होते. पण गुलजार दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात तरी ते राखी यांना मुख्य भूमिकेत घेतील असे त्यांना वाटले होते. पण गुलजार यांनी त्यांच्या चित्रपटासाठी देखील राखी यांना न घेणेच पसंत केले होते. त्याचदरम्यान आँधी या चित्रपटाचे चित्रीकरण काश्मीरमध्ये सुरू होते. चित्रपटाच्या टीमसाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत संजीव कुमार प्रचंड दारू प्यायले होते आणि सुचित्रा सेन यांनी या पार्टीतून जाऊ नये असे ते त्यांना सतत सांगत होते. पण सुचित्रा कर्म्फटेबल नव्हत्या. सुचित्रा निघत आहेत हे पाहाताच संजीव कुमार यांनी त्यांचा हात पडकला. अखेरीस गुलजार यांनी मध्यस्थी करत सुचित्रा यांना त्यांच्या रूमपर्यंत सोडले. राखी यांनी गुलजार यांना सुचित्रा यांच्या रूममधून बाहेर पडताना पाहिले आणि गुलजार तिथे का गेले होते हे राखी त्यांना सतत विचारत होत्या. पण या कारणामुळे राखी आणि गुलजार यांच्यात त्या दिवशी प्रचंड भांडणं झाली. एवढेच नव्हे तर गुलजार यांनी राखी यांच्यावर हात उचलला होता असे म्हटले जाते. 

राखी आणि गुलजार काश्मीरमध्ये चित्रीकरण करत असताना यश चोप्रादेखील त्यांच्या एका कामानिमित्त तिथे होते. या भांडणाच्या दुसऱ्याच दिवशी यश चोप्रा यांना भेटून राखी यांनी कभी खुशी कभी गम हा चित्रपट साईन केला. राखी यांनी चित्रपटसृष्टीत पुन्हा प्रवेश केल्याने त्यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढतच गेला.   


Web Title: A night which changed Gulzar-Raakhee's marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.