ठळक मुद्देकाही युझरनी त्याला चक्क जोकर म्हटले आहे तर काहींनी दीपिकाचे कपडे घालून आलास का असे विचारले आहे. असाच ड्रेस दीपिकाने ओम शांती ओममध्ये घातला होता अशी आठवण देखील नेटिझन्सने रणवीरला करून दिली आहे. 

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखला जातो. तो नेहमी वेगवेगळ्या कॉश्च्युममध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. रणवीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याच्या कपड्यांवर अनेकांनी कमेंट केले आहे.

रणवीर सिंगनेच त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याने घातलेल्या कपड्यांमुळे नेटिझन्स त्याची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. या फोटोत त्याने काळ्या रंगाचा पोल्का डॉटचा शर्ट घातला असून त्यावर स्ट्रीप्सची अतरंगी पँट घातली आहे. तसेच पोल्का डॉटची कॅप घातली आहे. तसेच यावर पिंक रंगाचे शूज देखील घातले आहेत. रणवीरच्या या खतरनाक लूकची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

रणवीरच्या या फोटोवर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत त्याच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केले आहे. पण नेटिझन्सने त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. काही युझरनी त्याला चक्क जोकर म्हटले आहे तर काहींनी दीपिकाचे कपडे घालून आलास का असे विचारले आहे. असाच ड्रेस दीपिकाने ओम शांती ओममध्ये घातला होता अशी आठवण देखील नेटिझन्सने रणवीरला करून दिली आहे. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणवीर लवकरच ८३ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तो क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील रणवीरचा लूक काहीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला.

याव्यतिरिक्त जयेशभाई जोरवाला या चित्रपटात रणवीर एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या लूकची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Web Title: Netizen ask is Ranveer Singh wearing Deepika's clothes in his latest look?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.