neha kakkar regrets breaking up with himansh kohli defends ex-boyfriend | नेहा कक्कडवर आली पश्चातापाची वेळ, म्हणे, मी खूप मोठी चूक केली!!

नेहा कक्कडवर आली पश्चातापाची वेळ, म्हणे, मी खूप मोठी चूक केली!!

ठळक मुद्देगतवर्षी सप्टेंबरमध्ये नेहाने हिमांशसोबतचे नाते अधिकृत केले होते. इंडियल आयडॉल १० च्या सेटवर हिमांशने नेहाला प्रपोज केले होते. पण यानंतर काहीच दिवसांत दोघांच्याही ब्रेकअपची बातमी आली होती.

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेकअपच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. नेहाचे ब्रेकअप झाले, हे खरे तर कुणाला कळण्याचे कारण नव्हते. पण बयाने स्वत:च सोशल मीडियावर या ब्रेकअपचा नको इतका गवगवा केला.  इतके कमी की काय म्हणून अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीच्या आठवणीने ढसाढसा रडली. साहजिकच नेहा ट्रोल झाली आणि या ट्रोलिंगनंतर आता काय तर म्हणे, पर्सनल लाईफ पब्लिक केल्याचा मला पश्चाताप होतोय.


होय, अलीकडे एका मुलाखतीत नेहाने हे पश्चातापाचे बोल ऐकवले. मी अतिशय संवेदनशील व्यक्ति आहे. माझ्या खासगी आयुष्यात गेल्या काही महिन्यांत जे काही झाले ते सगळेच दु:खद होते. ते मी बदलू शकत नाही. पण एका गोष्टीचा मात्र मला राहून राहून पश्चाताप होतोय. ती म्हणजे, माझे खासगी आयुष्य मी सार्वजनिक केले, असे ती म्हणाली.


नेहा इथेच थांबली नाही तर, आता मी अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही, असेही ती म्हणाली. तुमच्या भावना जगजाहिर केल्यानंतर लोक तुमच्याप्रति किती नकारात्मक होतात, हे मला अनुभवानंतर कळलेय. हिमांशने काहीही केलेले नसताना लोकांनी त्याला नाही ते ऐकवले. अजूनही तो ट्रोल होतोय. मी एकदा चूक केली. पण आता अशी चूक पुन्हा करणार नाही,असे नेहा म्हणाली. एकंदर काय तर आधी नेहा ब्रेकअपमुळे रडली आणि आता पश्चातापामुळे रडतेय. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करण्यातही अर्थ नाही, ही चूकही तिला लवकरच कळेल.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये नेहाने हिमांशसोबतचे नाते अधिकृत केले होते. इंडियल आयडॉल १० च्या सेटवर हिमांशने नेहाला प्रपोज केले होते. पण यानंतर काहीच दिवसांत दोघांच्याही ब्रेकअपची बातमी आली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: neha kakkar regrets breaking up with himansh kohli defends ex-boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.