ठळक मुद्देइंडियन आयडॉल 10 नंतर नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते.

आपल्या आवाजाने लाखो चाहत्यांना रिझवणारी बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर आज यशाच्या शिखरावर आहे. पण पर्सनल आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांभाळताना मात्र ती हताश झालेली दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन आयडॉल 10’चा स्पर्धक विभोर पाराशर याच्यासोबत नेहाचे नाव जोडले जात आहे.  नेहाने इंडियन आयडॉल 10  हा रिअ‍ॅलिटी शो जज केला होता. याच शोमधील एक स्पर्धक विभोर पाराशर आणि नेहाच्या डेटींगच्या बातम्या सध्या जोरात आहेत. अलीकडे नेहाने विभोरसोबत अनेक इव्हेंट केलेत. यादरम्यानचे दोघांचे फोटो, या फोटोतील दोघांची केमिस्ट्री बघता, त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विभोर चांगलाच खवळला होता.

‘या सगळ्या चर्चा तुम्ही अफवा समजू शकतात. कुणी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मदत करत असेल तर ते केवळ तुमच्यातील टॅलेंटमुळे. मी इन्स्टाग्रामवर नेहाला ‘दीदी’ म्हणून टॅग करत नाही, यावरून ती माझी गर्लफ्रेन्ड आहे, असा अर्थ लोकांनी लावला. आज मी जे काही आहे, केवळ तिच्यामुळे आहे. मी तिचा प्रचंड आदर करतो. अशा अफवांवर मी रिअ‍ॅक्ट होऊ नये, असे मला वाटते. अशा बातम्या ऐकल्या की माझी सटकते,’ असे तो म्हणाला होता. पण नेहाने मात्र या बातम्यांवर चुप्पी साधली होती. पण अखेर तिचा संयम संपला आणि तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून यावर खुलासा केला.

‘हे लिहितांना मी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या एकदम फिट आहे. पण मला बोलायचे आहे. मी कुणाची बहीण आहे, कुणाची मुलगी आहे,हे बोलणारे काध्यानात घेत नाहीत. मी आयुष्यभर कष्ट केले. माझ्या कुटुंबाला माझा अभिमान वाटावा, असेच वागले. एखाद्या अफवेचा लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, हे जाणून न घेता, तुम्ही लोकांबद्दल अफवा का पसरवता?  कुणाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे बंद करा. एखादी व्यक्ती हे सगळे सहन न झाल्याने स्वत:चे आयुष्य संपवेल, इतक्या स्तराला जाऊ नका,’ असे नेहाने या पोस्टमध्ये लिहिले.

दुस-या पोस्टमध्येही ती लिहिते, ‘जे लोक माझी चिंता करतात, त्यांना सांगू इच्छिते की मी ठीक आहे. वाईट काळ आहे. पण हा काळही जाईल. तुम्ही जगाला बदलवू इच्छित असाल तर एक काम करा, केवळ हे सगळे थांबवा, एवढेच लोकांना सांगा.’ तिस-या पोस्टमध्ये व्यक्त होताना, माझ्याजवळ माझा देव आहे आणि देवासारखे कुटुंब आहे, असे तिने लिहिले.

इंडियन आयडॉल 10 नंतर नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते. या ब्रेकअपनंतर नेहा सैरभैर झाली होती. साहजिकच  या दु:खातून सावरायला तिला बराच वेळ लागला.

Web Title: neha kakkar finally opens up on her dating rumour with indian idol contestant vibhor parashar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.