ठळक मुद्देनुकतेच एका वेबपोर्टलने नेहाला हिमांशबद्दल विचारले होते. हिमांशचे नाव ऐकताच नेहाने त्याला ओळखण्यास नकार दिला होते. ‘कौन हिमांश...मैं इस नाम के किसी भी शख्स को नहीं जानती हूं,’ असे नेहा म्हणाली होती. कृपया मला एकटे सोडा, अशी विनंतीही नेहाने केली होती.

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड हिचे अलीकडे बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. यानंतर नेहा आतून कोलमडून पडली आहे. इतकी की, ‘इंडियन आयडॉल 10’च्या सेटवरही तिला तिच्या भावना रोखता आल्या नाहीत. यानंतर नेहा कसेबसे स्वत:ला सावरले अन् सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, या वाईट फेजमधून बाहेर पडल्याचे संकेत दिलेत. पण हे संकेत देऊन काही दिवस होत नाहीत तोच, नेहाने असा काही खुलासा केला की, तो वाचून चाहत्यांना मोठा धक्का बसावा. होय, इन्स्टाग्राम स्टोरीवर नेहाने ती डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले आहे.


यासाठी नेहाने केवळ बॉयफ्रेन्डलाचं नाही तर अख्ख्या जगालाही दोषी ठरवले. खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडणाऱ्यांना, नाही नाही ते कमेंट्स करून वैताग आणणाºया लोकांबद्दलचा संताप नेहाने व्यक्त केला. होय, मी डिप्रेशनमध्ये आहे. याबद्दल जगातील सगळ्या निगेटीव्ह लोकांचे आभार. मला आयुष्यातील सगळ्यांत वाईट दिवसांचा अनुभव देण्यात तुम्ही यशस्वी झाला. तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन...असे नेहाने लिहिले.

माझ्यावर प्रेम करणाºयांची मी आभारी आहे. पण जे लोक मी कुठल्या परिस्थितीतून जातेय, याची पर्वा न करता माझ्याविषयी वाट्टेल ते बोलत आहेत, त्यांना मी विनंती करते, प्लीज हे सगळे थांबवा. मला माझे आयुष्य जगू द्या...असेही नेहाने म्हटले आहे.


नुकतेच एका वेबपोर्टलने नेहाला हिमांशबद्दल विचारले होते. हिमांशचे नाव ऐकताच नेहाने त्याला ओळखण्यास नकार दिला होते. ‘कौन हिमांश...मैं इस नाम के किसी भी शख्स को नहीं जानती हूं,’ असे नेहा म्हणाली होती. कृपया मला एकटे सोडा, अशी विनंतीही नेहाने केली होती. नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’केले आहे. केवळ इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे स्वत:चे सर्व व्हिडिओ व फोटो आपल्या सोशल अकाऊंटवरून डिलिट केले आहेत. नेहा व हिमांश दोघेही ‘ओह हमसफर’ या व्हिडिओत एकत्र दिसले होते.

Web Title: neha kakkar is in depression after break up with boy friend himansh kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.