neha kakkar broke down on the sets of super dancer chapter 3 | नेहा कक्कडला पुन्हा आली हिमांश कोहलीची आठवण! व्हिडीओ व्हायरल!!

नेहा कक्कडला पुन्हा आली हिमांश कोहलीची आठवण! व्हिडीओ व्हायरल!!

ठळक मुद्दे अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने हिमांशसोबतच्या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते. मी वेळ देत नाही, अशी त्याची तक्रार होती,असे ती म्हणाली होती.

नेहा कक्कड ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडली, असे वाटत असतानाच तिने पुन्हा एकदा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. होय,एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये गेस्ट म्हणून पोहोचलेली नेहा एक परफॉर्मन्स पाहून इतकी भावूक झाली की तिला अश्रू रोखता आले नाहीत. या शोच्या एका स्पर्धकाने ‘माही वे’ या गाण्यावर डान्स केला. हे गाणे नेहाने गायलेले आहे. डान्स परफॉर्मन्समध्ये प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता. हा परफॉर्मन्स पाहतांना नेहाला तिचा एक्स बॉयफ्रेन्ड हिमांश कोहलीची आठवण अनावर झाली आणि अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सध्या नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.


नेहाचे काही दिवसांपूर्वी हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर नेहाने सोशल मीडियावरचे त्याच्यासोबतचे सगळे फोटो डिलीट केले होते. या बे्रेकअपनंतर नेहा डिप्रेशनमध्ये गेली होती. खुद्द तिनेचं सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने हिमांशसोबतच्या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते. मी वेळ देत नाही, अशी त्याची तक्रार होती. मी त्याच्यासाठी माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. माझा सगळा वेळ, माझी ऊर्जा त्याच्यावर खर्च केली. पण तो त्या योग्यतेचा नव्हताच, असे ती म्हणाली होती.


पण कदाचित म्हणणे वेगळे आणि त्यानुसार वागणे वेगळे. ब्रेकअपमधून बाहेर पडले, हे नेहा कितीही सांगत असली तरी मुळात अजूनही ती यातून पुरती बाहेर पडलेली नाहीये. तिचा हा ताजा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: neha kakkar broke down on the sets of super dancer chapter 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.