neha dhupia reply to suchitra krishnamoorthi tweet about her getting talk shows | नेहा धूपियालाच सर्व टॉक शो कसे मिळाले? सुचित्रा कृष्णमूर्ती ‘चमचेगिरी’ म्हणाली, नेहा भडकली

नेहा धूपियालाच सर्व टॉक शो कसे मिळाले? सुचित्रा कृष्णमूर्ती ‘चमचेगिरी’ म्हणाली, नेहा भडकली

ठळक मुद्देसुचित्राने अचानक निशाणा साधल्याने नेहा धूपियाही बिथरली.

सुशांत सिंग राजपतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमचा वाद उफाळून आला आहे. आता या वादात अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी उडी घेतली. सुचित्रा यांनी या वादात करण जोहर आणि त्याची बेस्ट फ्रेन्ड नेहा धूपियाला लक्ष्य केले. यानंतर नेहा व सुचित्रा यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले.

काय म्हणाली सुचित्रा

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षाही चमचागिरी ही मोठी समस्या आहे, असा टोला सुचित्रा यांनी हाणला. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘बॉलिवूडमध्ये नेपोटिजम नाही तर चमचागिरीविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच की, अचानक नेहा धूपियाला सर्व टॉक शो कसे मिळाले? कारण एकच ती करण जोहरची खास नवी मैत्रिण आहे आणि फेमिना मिस इंडिया 2002 आहे. बॉलिवूडमध्ये ना तिचा कोणी नातेवाईक आहे, ना ती स्टार किड आहे.’  
सुचित्रा इथेच थांबली नाही तर तिने आणखी एक ट्विट केले. ‘शक्ती भ्रष्ट झाल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात पूर्णत: भ्रष्टाचार आहे. मग बॉलिवूड असो, राजकारण असो वा अन्य काही.  शक्तीच्या नशेत असलेले मेंदू योग्य व अयोग्य यात फरक करू शकत नाहीत. फक्त दोनच शब्द म्हणेल, ओम शांती,’ असे तिने लिहिले.
नेपोटिजमच्या वादात पहिल्यांदा नेहा धूपिया लक्ष्य झालेली पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.  याआधी करण जोहर, आदित्य चोप्रा, महेश भट, आलिया भट, सलमान खान, सोनम कपूर असे सगळे नेपोटिजमच्या मुद्यावरून ट्रोल झाले होते.

नेहा धूपिया भडकली

सुचित्राने अचानक निशाणा साधल्याने नेहा धूपियाही बिथरली.मग काय तिनेही सुचित्राला उत्तर दिले. ‘डिअर मॅम, गेल्या कित्येक वर्षांची मैत्री तोडणारे कदाचित हे सर्वात आक्षेपार्ह व अपमानास्पद ट्विट आहे. तुम्हाला याबद्दल काहीही माहित नाही. तुम्हाला जितके ठाऊक आहे, तेवढेच तुम्ही बोलत आहात. मी आज जिथे आहे, ते स्वत:च्या भरवशावर आहे आणि याचा मला अभिमान आहे.  मी एक मुलगी, पत्नी आणि आई असल्याचा मला अभिमान आहे आणि ज्या महिला या सर्व गोष्टी समजून घेतात त्यांचा मी आदर करते,’ या आशयाचे नेहाने ट्विट केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: neha dhupia reply to suchitra krishnamoorthi tweet about her getting talk shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.