Masaba Gupta Wedding : नीना गुप्तांची लेक मसाबानं गुपचूप उरकलं लग्न, नवऱ्याचं आहे अदिती राव हैदरीशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 13:02 IST2023-01-27T13:01:38+5:302023-01-27T13:02:13+5:30
Neena Gupta Daughter Masaba Gupta Wedding : अभिनेत्री नीना गुप्ता यांची एकुलती एक लेक आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आज लग्नबंधनात अडकली.

Masaba Gupta Wedding : नीना गुप्तांची लेक मसाबानं गुपचूप उरकलं लग्न, नवऱ्याचं आहे अदिती राव हैदरीशी कनेक्शन
Neena Gupta Daughter Masaba Gupta Wedding : अभिनेत्री नीना गुप्ता यांची एकुलती एक लेक आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आज लग्नबंधनात अडकली. मसाबाने आज (२७ जानेवारी) सकाळी अभिनेता सत्यदीप मिश्राशी गुपचूप लग्नगाठ बांधली. मसाबाचं हे दुसरं लग्न आहे. मसाबाने लग्नाचा एक सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली.
'आज सकाळी मी शांतीचा सागर असलेल्या मुलाशी लग्न केलं. आमच्या आयुष्यात प्रेम, शांती, स्थैर्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हास्य आहे. हा प्रवास खूप सुंदर असणार आहे...,' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
सत्यदीप आणि मसाबा दोघंही स्वभावाने लाजरे आहेत. दोघांनाही लग्नाचा गाजावाजा नको होतो. त्यामुळे मसाबा व त्याने अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केलं.
मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केलं होतं. २०१८ मध्ये दोघांनी घटस्फोटोसाठी अर्ज केला आणि २०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचं लग्न झालेलं नाही. मसाबा बॉलिवूडची एक यशस्वी फॅशन डिझाईनर आहे.
कोण आहे मसाबाचा पती सत्यदीप मिश्रा?
सत्यदीप मिश्रा याचं ही हे दुसरं लग्न आहे. अभिनेत्री राव हैदरी ही त्याची पहिली पत्नी. २०१३ मध्ये सत्यदीप व अदितीचा घटस्फोट झाला. नो वन किल्ड जेसिका या सिनेमातून सत्यदीपने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
'मसाबा मसाबा'च्या या नेटफिक्सवरच्या शोच्या सेटवर मसाबा व सत्यदीप यांची झाली होती. यात सत्यदीपने मसाबाच्या पूर्वाश्रमीच्या पतीची भूमिका साकारली होती. सत्यदीप हा अभिनेता असला तरी तो वकीलही आहे. 'मसाबा मसाबा' सेटवर मसाबा व सत्यदीप यांची मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली.