60 वर्षांच्या नीना गुप्तांचा ‘खल्लास’ डान्स, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 10:38 AM2019-07-09T10:38:46+5:302019-07-09T10:39:50+5:30

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही त्यांच्यातील उत्साह तरूणांना लाजवणारा आहे.

neena gupta dance with punjabi singer jassi gill watch video | 60 वर्षांच्या नीना गुप्तांचा ‘खल्लास’ डान्स, पाहा व्हिडीओ

60 वर्षांच्या नीना गुप्तांचा ‘खल्लास’ डान्स, पाहा व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१८ मध्ये ‘बधाई हो’, ‘वीरे दि वेडिंग’ आणि ‘मुल्क’ या चित्रपटात नीना दिसल्या होत्या. त्यानंतर आता त्या लवकरच ‘पंगा’, ‘सुर्यवंशी’, ‘म्युझिक टीचर’, ‘ग्वाल्हेर’ यांसारख्या चित्रपटातही दिसणार आहेत.

अभिनेत्री नीना गुप्ता यांची कुठलीही नवी ओळख करून द्यायची गरज नाही. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही त्यांच्यातील उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. त्यांचा ताजा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही ते पटेल.
 नीना गुप्ता सर्रास स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असतात. पण आता त्यांनी स्वत:चा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या पंजाबी सिंगर जस्सी गिलसोबत एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील नीना यांचा डान्स तुम्हाला खल्लास केल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.


अलीकडे नीना त्यांच्या बोल्ड फॅशन सेन्सबद्दल बोलल्या होत्या. या वयातही तरूण भूमिका मिळाव्यात म्हणून तुम्ही इतक्या बोल्ड राहता का? असा प्रश्न त्यांना केला गेला होता. यावर नीना यांनी अगदी प्रामाणिक उत्तर दिले होते.

‘माझ्या बोल्ड फॅशनमुळे मला यंग अ‍ॅक्ट्रेसचे रोल तर मिळाले नाहीत. पण परमेश्वराने मला इतके सुंदर शरीर दिले, याचा मला आनंद आहे. मी फॅशनबद्दल प्रचंड कॉन्शिअर राहते. माझ्या हॉट फोटोंवर प्रचंड कमेंट्स येतात. साध्या कपड्यातला फोटो शेअर केला की, त्यावर तितक्या कमेंट पडत नाहीत. पण हॉट फोटो शेअर करताच कमेंट्सचा पूर येतो. मी हे सगळे खूप एन्जॉय करते. मला फार कमी निगेटीव्ह कमेंट्स मिळतात,’ असे त्या म्हणाल्या होत्या. नीना गुप्ता काळासोबत अधिकाधिक फॅशनेबल होत आहेत. साडी ते वनपीस असे वेगवेगळे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. नीना गुप्तांच्या फॅशन आणि स्टाईलमागे त्यांची मुलगी मसाबा हेही एक कारण आहे. मसाबा बॉलिवूडची एक लोकप्रिय फॅशन डिझाईनर आहे. तीच नीना यांच्यासाठी कपडे डिझाईन करते.  

Web Title: neena gupta dance with punjabi singer jassi gill watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.