ठळक मुद्देनीलम आणि बॉबी लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण या अफेअरची कुणकुण बॉबीचे वडील धर्मेंद्र यांना लागली आणि त्यांनी या नात्याला विरोध केला असे म्हटले जाते.

नीलम कोठारीने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचे खुदगर्ज, हत्या, आग ही आग, खतरों के खिलाडी यांसारखे अनेक चित्रपट गाजले होते. त्या काळात नीलम प्रेक्षकांची प्रचंड लाडकी अभिनेत्री होती. गोविंदा, चंकी पांडे यांच्यासोबत तर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 

नीलमने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणे खूपच कमी केले आहे. तिचे लग्न अभिनेता समीर सोनीसोबत झाले असून त्या दोघांना एक मुलगी आहे. समीरसोबत लग्न होण्याआधी तिचे लग्न ऋषी सेठीया या व्यवसायिकासोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. 

तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी नीलम आणि बॉबी देओल हे नात्यात होते. नीलम आणि बॉबी एकमेकांच्या प्रेमात अक्षरशः वेडे झाले होते. पण जवळजवळ पाच वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. नीलम आणि बॉबी नात्यात असले तरी त्यांनी ही गोष्ट कधीच मीडियात कबूल केली नव्हती. पण इंडस्ट्रीतील त्यांच्या जवळच्या लोकांना याविषयी माहिती होते. ते दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. पण या अफेअरची कुणकुण बॉबीचे वडील धर्मेंद्र यांना लागली आणि त्यांनी या नात्याला विरोध केला असे म्हटले जाते. त्यांच्या घरातील सून ही बॉलिवूमधील नायिका नसावी असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी त्यांच्या नात्यासाठी नकार दिला अशी चर्चा त्या काळात चांगलीच रंगली होती.

नीलमने स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बॉबी आणि तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते. तिने म्हटले होते की, बॉबी आणि तिने संगनमताने वेगळे व्हायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या ब्रेकअपसाठी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला जबाबदार धरले जाऊ नये. बॉबी आणि पूजा भट्टची जवळीक वाढल्यानंतर आम्ही ब्रेकअपचा निर्णय घेतला असे मीडियात म्हटले जात आहे. पण या गोष्टीत काहीही तथ्य नाहीये. तसेच बॉबीच्या पालकांनी मी कधीच भेटलेली नाही असा देखील उल्लेख तिने या मुलाखतीत केला होता.  

Web Title: neelam kothari and bobby deol was in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.