‘करण जोहरचे नाव घे...’; ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या क्षितीज प्रसादचे NCBवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 03:53 PM2020-09-28T15:53:14+5:302020-09-28T15:54:15+5:30

NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही केले धक्कादायक आरोप   

ncb drugs probe accused kshitji prasad accuses ncb of blackmailing him into-implicating-karan-johar | ‘करण जोहरचे नाव घे...’; ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या क्षितीज प्रसादचे NCBवर गंभीर आरोप

‘करण जोहरचे नाव घे...’; ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या क्षितीज प्रसादचे NCBवर गंभीर आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देक्षितीज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनचा निर्माता असल्याचा दावा प्रारंभी करण्यात आला होता. मात्र गेल्या आठवड्यात करण जोहरने स्वत: क्षितीज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनशी जोडलेला असलेल्या आरोपाचे खंडन केले होते. 

सुशांत सिंग राजपूत केसशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात गेल्या आठवड्यात एनसीबीने चित्रपट निर्माता क्षितीज प्रसाद याला अटक केली. आता याच क्षितीजने एनसीबीवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रविवारी मुंबई उच्च न्यायालयात हे आरोप केले. एनसीबीने चौकशीदरम्यान क्षितीजला ब्लॅकमेल केले. त्याला त्रास दिला. इतकेच नाही तर करण जोहर व त्यांच्या टॉप टॉप एक्सीक्युटिव्हची नावे घे, आम्ही तुला सोडून देऊ, असे म्हणत एनसीबी अधिका-यांनी क्षितीजवर दबाव आणला, असे मानेशिंदे म्हणाले.

काय म्हणाले क्षितीजचे वकील
क्षितीजच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की, एनसीबी अधिका-यांनी चौकशीदरम्यान क्षितीजवर दबाव टाकण्याचा तसेच त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.  करण जोहर, सोमेल मिश्रा, राखी, अपूर्वा, नीरज वा राहिल यांची नाव  घेतल्यास आम्ही तुला सोडून देऊ, असे एनसीबी अधिकारी क्षितीजला म्हणाले.
क्षितीजच्या हवाल्याने वकील मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘एनसीबी अधिका-यांनी मला खोटे आरोप लावण्यास सांगितले. करण जोहर व त्यांची टीम ड्रग्ज घेते, असे बयान देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला. मात्र मी त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही. कारण मी व्यक्तिश: कोणालाही ओळखत नाही. ज्यांना मी व्यक्तिश: ओळखत नाही, त्यांच्यावर मी खोटे आरोप लावू शकत नाही.’


घेतले समीर वानखेडे यांचे नाव
क्षितीजच्या वकीलांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव घेत त्यांच्यावरही धक्कादायक आरोप केले. क्षितीजच्या वकीलांनी कोर्टासमोर सांगितले की, समीर वानखेडे यांनी क्षितीजला वाईट वागणूक दिली.  तू ऐकले नाही, तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील, असे समीर वानखेडे क्षितीजला म्हणाले. इतकेच नाही तर चौकशीदरम्यान समीर यांनी क्षितीजला त्यांच्या खुर्चीजवळ खाली जमिनीवर बसायला सांगितले. क्षितीजच्या चेह-याजवळ शूज घातलेला पाय नेत, तुझी हीच लायकी आहे, असेही क्षितीजला म्हणाले.
समीर क्षितीजला अशी वागणूक देत असताना अन्य एनसीबी अधिकारी हसत होते.

धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला NCB ने ताब्यात घेताच करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

इतके फिट कलाकार तुम्हाला ड्रग्ज अ‍ॅडिक्ट वाटतातच कसे? जावेद अख्तर यांनी केली बॉलिवूडची पाठराखण

क्षितीज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनचा निर्माता असल्याचा दावा प्रारंभी करण्यात आला होता. मात्र गेल्या आठवड्यात करण जोहरने स्वत: क्षितीज प्रसाद हा धर्मा प्रॉडक्शनशी जोडलेला असलेल्या आरोपाचे खंडन केले होते. क्षितीजने धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित धर्मेटिक एंटरटेनमेंट नोव्हेंबर  2019 मध्ये ज्वाईन केले होते. एका प्रोजेक्टसाठी कॉन्ट्रक्ट बेसिसवर त्याने ही कंपनी ज्वाईन केली होती. मात्र हा प्रोजेक्ट सुरु झाला नव्हता, असा खुलासा करण जोहरकडून करण्यात आला होता. क्षितीजचा व धर्मा प्रॉडक्शनचा काहीही संबंध नाही, असेही करणने स्पष्ट केले होते.

Web Title: ncb drugs probe accused kshitji prasad accuses ncb of blackmailing him into-implicating-karan-johar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.