Nawazuddin siddhik brother shamas nawab siddiqui debut in bollywood | नवाजुद्दीन सिद्दीकीनंतर त्याच्या कुटुंबातील हा सदस्य करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, हा असणार पहिला प्रोजेक्ट

नवाजुद्दीन सिद्दीकीनंतर त्याच्या कुटुंबातील हा सदस्य करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण, हा असणार पहिला प्रोजेक्ट

ठळक मुद्दे'बोले चुडिया' या सिनेमात नवाज एका रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार आहेनवाजुद्दीनचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय

शिवसेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका रुपेरी पडद्यावर  साकारल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. 'बोले चुडिया' या सिनेमात नवाज एका रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. वूडपेकर मुव्हीजचे राजेश भाटिया आणि किरण भाटिया या सिनेमाची निर्मिती करत आहेत. नवाजुद्दीनचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. याआधी शमासने अनेक शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. 'हा रोमँटिक ड्रामा मी जगलो असून त्यावर खूप काम केले आहे. त्यातच नवाजभाईंना घेऊन पदार्पण करणे ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे' असे शमास नवाब सिद्दीकी सांगतो. 


'मोतीचूर चकनाचूर'नंतर नवाजभाईसोबत परत काम करता येत असल्याचा आनंद आहे. भाई अष्टपैलू कलाकार असून आता या सिनेमातील उत्कट प्रेमीच्या भूमिकेलाही तितकाच न्याय देतील याचा आम्हाला विश्वास आहे. या सिनेमाची संकल्पना आणि मुळात कथा आम्हाला मनापासून भावली आहे.

पुढच्या ४५ दिवसांत सिनेमाचे शूटिंग केले जाईल. मे महिन्यापासून ते २० जूनपर्यंत या सिनेमाचे शूटिंग चालणार आहे.  यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये सिनेमा प्रदर्शित करणे हे आमचे लक्ष्य आहे' असे राजेश भाटिया यांनी सांगितले.  या रोमँटिक ड्रामामध्ये नवाजुद्दीनच्या प्रेयसीच्या भूमिकेत कोण दिसेल हे जवळजवळ कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने ठरवले आहे. प्रोडक्शन हाऊसचे कॉन्टेन्ट हेड असलेल्या किरण भाटिया सांगतात, '२०१९-२०मध्ये आम्ही जे ५ सिनेमे बनवणार आहोत त्या सगळ्याच्या कास्टिंगच्या कामासाठी आम्ही खास मुकेशला घेतले आहे. बोले चुडियामधील त्याची ही निवड परत एकदा सकारात्मक चर्चेचा विषय असेल याची आम्हाला खात्री आहे'.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nawazuddin siddhik brother shamas nawab siddiqui debut in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.