क्रिकेट टीममधील खेळाडू व बॉलिवूड अभिनेत्रींच्या रिलेशनशीपबद्दलच्या चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असतात. तर त्यातील बऱ्याचदा अफवा ठरतात तर काही विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्यासारखे सेलेब्सच्या नात्याचं रुपांतर लग्नात होते. आता आणखीन एका बॉलिवूडमधील अभिनेत्री व एका क्रिकेटरचं नाव समोर आलं आहे. हा क्रिकेटर म्हणजे ऑलराउंडर हार्दीक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्तानकोविक. 

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार हार्दिक पांड्याने नताशाला आपल्या घरातल्यांना भेटवलं आहे आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकू शकतात.

या दोघांच्या अफेयरच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगल्या होत्या. या चर्चेला दुजोरा तेव्हा मिळाला जेव्हा नताशाने हार्दिकच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मेसेज लिहिला होता. अद्याप त्यांच्या नात्याबद्दलच्या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.


नताशाबद्दल सांगायचं तर नताशा सर्बियाला वास्तव्यास आहे. तिच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं तर बॉलिवूडमध्ये काही आयटम साँग्स केले आहेत. तिच्या आयटम साँग्समध्ये सत्याग्रह व फुकरे रिटर्न्सचा समावेश आहे. यासोबतच नताशा बादशाहचे गाणं डीजेवाले बाबूसाठी ओळखली जाते. 


नताशा रुपेरी पडद्यासोबत छोट्या पडद्यावर झळकली आहे. नताशा २०१४ साली प्रसारीत झालेल्या बिग बॉसच्या ८व्या सीझनमुळे चर्चेत राहिली होती.

तसेच ती स्टार प्लस वाहिनीवरील नच बलिए डान्स रिएलिटी शोमध्ये झळकली आहे. या शोमध्ये नताशासोबत अली गोनी सहभागी होता.


Web Title: Natasa Stankovic Can Marry Indian Cricket Team Player Hardik Pandya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.