Birthday Special : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसोबत होते नागार्जुनचे अफेअर, यामुळे होऊ शकले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:00 AM2019-08-29T08:00:00+5:302019-08-29T08:00:08+5:30

साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन याचा आज वाढदिवस.

nagarjuna birthday special nagarjuna interesting facts personal life | Birthday Special : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसोबत होते नागार्जुनचे अफेअर, यामुळे होऊ शकले नाही लग्न

Birthday Special : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसोबत होते नागार्जुनचे अफेअर, यामुळे होऊ शकले नाही लग्न

googlenewsNext
ठळक मुद्दे  नागार्जुनकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. ही संपत्ती 3000 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते.

साऊथ  सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन याचा आज वाढदिवस आहे. 29 ऑगस्ट1959 रोजी जन्मलेल्या नागार्जुनला वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला. त्याचे वडिल नागेश्वर राव अक्किनेनी तेलगू सिनेमाचे सुपरस्टार होते.  

 

साऊथ सिनेमांशिवाय नागार्जुनने बॉलिवूडमध्येही   नशीब आजमावले. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी त्याचा दबदबा राहिला.   
बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांत काम केल्यानंतर 1986 मध्ये ‘विक्रम’ या चित्रपटातून नागार्जुनने लीड अ‍ॅक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, नागार्जुनचा हा पहिला चित्रपट बॉलिवूडचा सुपरडुपर हिट सिनेमा ‘हिरो’चा रिमेक होता. ‘विक्रम’ हिट झाला आणि सोबत नागार्जुनही हिट झाला.

नागार्जुनने दोन लग्ने केलीत. 1984 मध्ये त्याने लक्ष्मी दग्गुबतीसोबत लग्न केले. 1986 मध्ये दोघांना मुलगा झाला. नागा चैतन्य हे त्याचे नाव. 1990 मध्ये नागार्जुन व लक्ष्मीचा घटस्फोट झाला. यानंतर नागार्जुन यांनी अमला अक्किनेनीसोबत दुसरे लग्न केले.   दोघांना अखिल अक्किनेनी नावाचा मुलगा आहे.

नागार्जुनचे एक अफेअरही चांगलेच गाजले. होय, एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नागार्जुनचे अफेअर होते. ही अभिनेत्री कोण तर तब्बू. एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेषत: तब्बू नागार्जुनसाठी अक्षरश: वेडी होती. इतकी की, मुंबई सोडून तिने हैदराबादेत नागार्जुनच्या शेजारी घर घेतले होते. तब्बूने अनेक वर्षे नागार्जुनची प्रतीक्षा केली. पण नागार्जुन पत्नीला घटस्फोट द्यायला तयार नव्हता. दोघेही 15 वर्षे एकमेकांसोबत होते. पण नागार्जुन विवाहित असल्याने या नात्याला कुठलेच भवितव्य नव्हते. अखेर तब्बूने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि  2012 मध्ये दोघेही कायमचे विभक्त झालेत. तब्बू आजही अविवाहित आहे.


  नागार्जुनकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. ही संपत्ती 3000 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. तो अन्नपूर्णा स्टुडिओ प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. हा स्टुडिओ सुमारे ७ एकरच्या आवारात पसरलेला आहे. हैदराबादेतील अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ फिल्म अँड मीडियाचा तो अध्यक्ष आहे. याशिवाय एमएनएन रियलिटी इंटरप्राइजेजचा फाऊंडिग पार्टनर देखील आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या आहेत.

Web Title: nagarjuna birthday special nagarjuna interesting facts personal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.