घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य चर्चेत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 02:52 PM2021-10-13T14:52:10+5:302021-10-13T14:57:03+5:30

तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचे सर्वात क्युट कपल म्हणून समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्यला ओळखले जात होते. दोघांमधली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती.

Naga Chaitanya once again in limelight post his divorce, check what's the reason | घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य चर्चेत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य चर्चेत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Next

गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि समंथा अक्किनेनी त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. नागा चैतन्यने स्वतःहून घटस्फोट घेत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. नागा चैतन्यने त्यांच्या नात्याविषयी भलीमोठी पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याचे सांगताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचे सर्वात क्युट कपल म्हणून समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्यला ओळखले जात होते. दोघांमधली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती.मात्र गेल्या वर्षापासून दोघांचे बिनसल्याचे चर्चा होत्या. गेल्या काही दिवसांपासून दोघेही वेगळेच राहत होते.

Also Read: सामंथासोबतच्या घटस्फोटानंतर अशी झालीये नागा चैतन्यची अवस्था, महिनाभरापासून हॉटेलातच मुक्काम

जुलै महिन्यात सोशल मीडियावरुन समंथाने सासरचे आडनाव ‘अक्किनेनी’ हटवले होते. तेव्हापासून दोघांच्या नात्यात फुट पडल्याचे चाहते तर्कवितर्क लावले जात होते. घटस्फोटाच्या चर्चांवर मात्र समांथा आणि नागाचैत्य दोघांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. अखेर दोघांनीही त्यांच्या नात्यावर भाष्य करत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले . यानंतर समंथा आणि नागा चैतन्य दोघांचीही वेगेवगेळी माहिती समोर येत आहे. तुर्तास घटस्फोटाच्या बातमीनंतर नागा चैतन्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने तेलुगू सिनेमाचे पोस्ट शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


लग्नानंतर सामंथाने तिचे सिनेमा करिअर सुरु ठेवले होते. सिनेमात बोल्ड सीन्स देणे,इतकेच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची.हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना या गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. समांथाला याविषयी अनेकदा दोघांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर समांथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती.समांथाला तिच्या घरच्यांचा कामासाठी विरोध करणे खटकत होते. 

अखेर याच कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाल्याचे बोलले जाते.समंथा आणि नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वी वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. नागार्जुन हा कमल हसनची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर समंथादेखील  ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थच्या प्रेमात होती. नागा चैतन्य आणि समंथा दोघांचेही पहिल्या रिलेशनशिपमधून ब्रेकअप झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अखेर या दोघांचेही नाते फार काळ काही टिकू शकले नाही. 

Web Title: Naga Chaitanya once again in limelight post his divorce, check what's the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app