Music director Sajid Khan impressed by Indo-Polish film 'No Means No' !! | संगीत दिग्दर्शक साजिद वाजिद इंडो-पोलिश चित्रपट ‘नो मीन्स नो’ने प्रभावित!!

संगीत दिग्दर्शक साजिद वाजिद इंडो-पोलिश चित्रपट ‘नो मीन्स नो’ने प्रभावित!!

२०२१ या वर्षात अनेक धमाकेदार आणि बिग बजेट चित्रपटांची ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यातच एका चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागलीय. तो चित्रपट म्हणजे ‘नो मीन्स नो’. अ‍ॅक्शन, रोमान्स, थ्रिलर यांच्यासह अनेक साहसी दृश्यांची मेजवानी असलेला या चित्रपटाची सर्वत्र प्रचंड चर्चा सुरू आहे. बॉलिवूड सर्कलमधूनही या चित्रपटाचे कौतुक होताना दिसतेय. आता बॉलिवूडच्या सर्वांत दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या साजिद वाजिद  यांनी ‘नो मीन्स नो’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. मुख्य अभिनेता असलेल्या ध्रुव वर्मा याला ‘बॉलिवूडचा जेम्स बाँड’ म्हणत साजिद यांनी त्याची प्रशंसा केलीय.

 संगीत दिग्दर्शक साजिद वाजिद हे ‘नो मीन्स नो’ चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या विकाश वर्मा यांच्याबद्दल सांगतात,‘बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत गुणी दिग्दर्शक हे विकाश वर्मा आहे. तो माझा खुप चांगला मित्र देखील आहे. तसेच त्याचा मुलगा म्हणजेच या चित्रपटातील मुख्य अभिनेता धु्रव वर्मा हा देखील अत्यंत हँडसम आणि प्रभावी व्यक्तीमत्त्वात दिसत आहे. त्याच्या अ‍ॅक्शन सीन्सवर मी फिदा झालोय. या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत दिसून येतेय.’

 बॉलिवूडच्या सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नो मीन्स नो’ चित्रपटात ध्रुव वर्मा या नव्या दमाच्या अभिनेत्याने त्याच्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. सिक्स पॅक्स अ‍ॅब्ज या संकल्पनेला मागे टाकत त्याने हुबेहूब ‘जेम्स बाँड’प्रमाणे स्वत:चा लूक तयार केला आहे. या चित्रपटात भारत आणि पोलंडचे कलाकार असून पोलंडच्या निसर्गरम्य ठिकाणी उणे ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.   

‘नो मीन्स नो’ या बिग बजेट चित्रपटातून डेब्यू करणारा ध्रुव वर्मा सध्या सर्व प्रेक्षकांच्या आकर्षणाचे कें द्रस्थान ठरला आहे. त्याचे लूक्स, बॉडी आणि स्टाईल यावर नवी पिढी फिदा झाली आहे. या सर्वांचे श्रेय जाते त्याच्या नव्या लूकला. आजही अनेक अभिनेते हे सिक्स पॅक्स अ‍ॅब्जसाठी खुप मेहनत घेताना दिसतात. मात्र, या चित्रपटातून ध्रुवने जेम्स बाँडचा नवा लूक चर्चेत आणला आहे. यासाठी त्याला बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त आणि हॉलिवूड स्टार स्टिव्हन सेगल यांनी अ‍ॅक्शनचे धडे दिले आहेत. त्याची ग्रुमिंग अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्याकडून के ली आहे. तसेच बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांनी त्याला डान्सचे विविध प्रकार शिकवले आहेत. तसेच विकाश वर्मा यांचा दुसºया महायुद्धावर आधारित आगामी चित्रपट ‘द गुड महाराजा’ याचेही शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाची शूटिंग जर्मनी, पोलंड, रूस, भारतात होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Music director Sajid Khan impressed by Indo-Polish film 'No Means No' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.