बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा लोकप्रिय चित्रपट 'दबंग'चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील आयटम साँगचं नुकतंच शूटिंग पार पडले आहे. दबंगमधील मलायका अरोराच्या दमदार नृत्यानं सजलेलं मुन्नी बदनाम हुई या गाण्यानं प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली होती. आता तिसऱ्या भागात मुन्ना बदनाम हुआ हे गाणं रसिकांना पहायला मिळणार आहे. या गाण्याचं चित्रीकरण पार पडलं आहे. या गाण्यात मलायका नाही तर अभिनेत्री वरीना हुसैनची वर्णी लागलीय. या गाण्यावर वरीना व सलमान पहायला मिळणार असल्याचे समजतं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान व दबंग चित्रपटाच्या टीमला एक स्पेशल साँग हवं होतं आणि या गाण्याला न्याय देईल अशी अभिनेत्री हवी होती. त्यासाठी सलमान व त्यांच्या टीमनं वरीना हुसैनची निवड केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, वरीना या गाण्यात वेगळ्या अंदाजात पहायला मिळणारेय.

तिचा लूक सलमान खानचा डिझायनर एशले लोबोने डिझाईन केलाय. वरीना इंडो वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसणारेय. या गाण्याचे शूटिंग वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये चार दिवस चालले होते. यावेळी गाण्याचं शूटिंग मॉडर्न ढाब्यामध्ये झाले आणि या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन वैभवी मर्चंटने केले आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सलमान व वरीना यांनी खूप मस्ती केली. गाण्यात सलमान वरीनाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करताना दिसणारेय.


दबंगमध्ये मलायका अरोराने मुन्नी बदनाम हुई गाण्यावर आपल्या जलवा दाखवून सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावलं होतं. त्यानंतर दबंग २मध्ये बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरने फेविकॉल से या गाण्यावर थिरकून सर्वांना चांगलीच भुरळ पाडली.

आता वरीना हुसैन मुन्ना बदनाम हुआ गाण्यावर थिरकून रसिकांना भुरळ पाडेल का, हे पाहणं कमालीचं ठरणारेय.

Web Title: 'Munni Badnam ...' is now by 'Munna Badnam Hua' song in 'Dabang 3', This actress will be seen in this song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.