The Family Man 2 : मुंबई पोलिसांनी शेअर केलेलं ‘ते’ मीम पाहून चेल्लम सर खुश्श;  म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 01:00 PM2021-06-22T13:00:08+5:302021-06-22T13:00:53+5:30

The Family Man 2 : अभिनेता मनोज वाजपेयीची ‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज सध्या जाम चर्चेत आहे आणि त्याहीपेक्षा चर्चेत आहेत ते चेल्लम सर.

mumbai police share the family man 2 chellam sir meme actor uday mahesh give reply | The Family Man 2 : मुंबई पोलिसांनी शेअर केलेलं ‘ते’ मीम पाहून चेल्लम सर खुश्श;  म्हणाले...

The Family Man 2 : मुंबई पोलिसांनी शेअर केलेलं ‘ते’ मीम पाहून चेल्लम सर खुश्श;  म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देसीरिजमध्ये चेल्लम सर  केवळ 15  मिनिटांसाठी दिसतात. पण या 15 मिनिटांत प्रेक्षकांची मनं जिंकतात.  

अभिनेता मनोज वाजपेयीची  (Manoj Bajpayee) ‘द फॅमिली मॅन 2’  (The Family Man 2) ही सीरिज सध्या जाम चर्चेत आहे आणि त्याहीपेक्षा चर्चेत आहेत ते चेल्लम सर. होय, साऊथ स्टार उदय महेशनं साकारलेलं सीरिजमधील चेल्लम सरांचं पात्र सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालं. या चेल्लम सरांवरचे शेकडो मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अगदी उत्तर प्रदेश आणि मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवरही चेल्लम सर पोहोचलेत. (Chellam Sir Mems)
होय, मुंबई पोलिसांनी चेल्लम सरांवरचं एक मजेशीर मीम शेअर केलं. आता खुद्द चेल्लम सरांनी या मीमवर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या मीमच्या कॅप्शनमध्ये एक संदेश देण्यात आला होता. ‘फ्री पिकअप आणि लॉकअपमध्ये वेळत, या कॅप्शनसह  कोणत्याही वेळी पोलीस मदतीसाठी दक्ष असल्याचा संदेश मुंबई पोलिसांनी याद्वारे दिला होता. 

मुंबई पोलिसांनी चेल्लम सरांचं मीम्स शेअर केल्यानंतर आता अभिनेते उदय महेश यांनी प्रतिक्रिया दिलीय.  मी खरोखरच मुंबई पोलिसांचा आभारी आहे. कारण त्यांनी एका चांगल्या कामासाठी माझ्या मीमचा वापर केला, असं ते म्हणाले.
याआधी उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील चेल्लम सरांच्या मीम्सच्या मदतीनं संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ‘द फॅमिली मॅन-2’ या वेब सीरिजमध्ये चेल्लम सर  केवळ 15  मिनिटांसाठी दिसतात. पण या 15 मिनिटांत प्रेक्षकांची मनं जिंकतात.   सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीच्या मित्राचं (मदतनीस) नाव चेल्लम सर असं आहे. तो एक निवृत्त झालेला डिटेक्टिव्ह आहे. जेव्हा कधी श्रीकांतला मदतीची गरज भासते तेव्हा तो कायम धावून येतो. त्याला त्यांच्या कामात मार्गदर्शन करतो.

Web Title: mumbai police share the family man 2 chellam sir meme actor uday mahesh give reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.