Mrinal Thakur had done 70% shooting of 'Baahubali: Before the Beginning' and left the series due to this reason. | 'बाहुबली: बिफोर द बिगनिंग'चे मृणाल ठाकुरने केले होते ७०% शूटिंग पूर्ण, या कारणामुळे सोडली सीरिज

'बाहुबली: बिफोर द बिगनिंग'चे मृणाल ठाकुरने केले होते ७०% शूटिंग पूर्ण, या कारणामुळे सोडली सीरिज

'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या चित्रपटांतील ‘बाहुबली’ नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. होय, अभिनेता प्रभासने या चित्रपटात बाहुबली साकारला तर अभिनेत्री रम्या कृष्णन हिने राजमाता शिवगामी देवीचे पात्र जिवंत केले.या भूमिकेने रम्याला बरीच लोकप्रियता दिली. नेटफ्लिक्‍सच्या सीरीजमध्ये ही भूमिका साकारली होती अभिनेत्री मृणाल ठाकुरने. 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' असे या आगामी सीरिजचे नाव आहे. पहिल्या दोन भागात शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला आता सीरिजमधून बाहेर काढण्यात आले आहे. 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' या आगामी सीरिजचे ७५ टक्‍के चित्रीकरण पूर्ण झाले होते. मात्र मृणालचा अभिनय निर्मात्यांना आवडला नसल्याने तिला या सीरिजमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तिच्या जागी आता अभिनेत्री वामिका गाबी हिची वर्णी लागली आहे. ही अभिनेत्री या भूमिकेला योग्य त्या प्रकारे न्याय देऊ शकेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्‍त केली आहे. मृणालसोबत आणखीन काही कलाकारांना सीरिजमधून बाहेर काढण्यात आले आहे.


परंतु दुसरीकडे मृणालच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी तिला रिप्लेस केले नाही तर तिने स्वतःच ही सीरिज सोडली आहे. कारण दोन वर्षांपासून प्रोडक्शन हाउसकडून या सीरिजचे काम करण्यात टंगळमंगळ पहायला मिळत होते. मृणाले दोन वर्षे या सीरिजचे ७० टक्के शूटिंग पूर्ण केले होते. यादरम्यान मृणालकडे काही इतर प्रोजेक्ट्सचे कमिटमेंट्स होते. ज्याच्या शूटिंगच्या तारखा आधीपासून फायनल झाल्या होत्या. त्यामुळे मृणालला ही सीरिज सोडावी लागली. 


मृणाल ठाकूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती तुफान, जर्सी, पिप्पा, आँख मिचौली या चित्रपटात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mrinal Thakur had done 70% shooting of 'Baahubali: Before the Beginning' and left the series due to this reason.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.