लग्नाच्या चर्चांमध्ये मौनी रॉयचे दुबईतल्या समुद्र किनाऱ्यावरचे बोल्ड फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 12:13 PM2021-01-18T12:13:20+5:302021-01-18T12:25:26+5:30

मौनी रॉय सध्या तिच्या लग्नाला घेऊन चर्चेत आहे.

Mouni roy posts her bold photos from dubai beach amid marriage rumours with suraj nambiar | लग्नाच्या चर्चांमध्ये मौनी रॉयचे दुबईतल्या समुद्र किनाऱ्यावरचे बोल्ड फोटो व्हायरल

लग्नाच्या चर्चांमध्ये मौनी रॉयचे दुबईतल्या समुद्र किनाऱ्यावरचे बोल्ड फोटो व्हायरल

googlenewsNext

मौनी रॉय सध्या तिच्या लग्नाला घेऊन चर्चेत  आहे. मौनी दुबईस्थित बँकर सूरज नंबियारयाला डेट करते आहे. लवकरत ती त्याच्याशी लग्न करु शकते अशी चर्चा आहे. याच दरम्यान मौनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मौनीचे हे फोटो दुबईतल्या समुद्र किनाऱ्यावरचे आहेत. मौनी या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

मौनीचे हो फोटो तिच्या चाहत्यांनाही आवडले आहेत.  मौनीने आपल्या फॅन्ससोबतचे काही व्हिडीओही अपलोड केले आहेत.


लॉकडाऊनच्या काळात बरेच महिने मौनी आपल्या बहिणीच्या घरी होती. याचकाळात तिची सूरजशी ओळख झाली. मौनीने आपले रिलेशनशीप इन्स्टाग्रामवर ऑफिशीयल केलं आहे. मौनीने मध्यंतरी सूरजसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता मात्र त्यानंतर तो डिलीट केले.

इतकेच नाही तर मोनीने सूरज आणि त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने सूरजच्या आईवडिलांना मॉम व डॅड म्हटले होते. मौनीच्या एका जवळच्या व्यक्तिने दिलेल्या माहितीनुसार, मौनी सूरजच्या कुटुंबाच्या खूप जवळ आली आहे. त्याच्या पालकांसोबत तिची चांगलीच गट्टी जमलीये. सूरजसोबत लग्न करण्याच्या निर्णयामागे हेही एक कारण आहे.


एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत दिसली होती. यानंतर मौनी 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेंमध्ये दिसली होती. 2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

Web Title: Mouni roy posts her bold photos from dubai beach amid marriage rumours with suraj nambiar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.