ठळक मुद्देतिने इन्स्टावर दुखापत झाल्याचा फोटो शेअर केला आहेमौनीच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती

मौनी रॉयने अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सध्या मौनी संदर्भात जी बातमी ऐकायला मिळते आहे ती ऐकून तिचे फॅन्स निराश होऊ शकतात. मौनीला दुखापत झाल्यामुळे दोन दिवस तिला मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या गोष्टीचा खुलासा स्वत: मौनीने इन्स्टाग्रामवर केला आहे. तिने इन्स्टावर दुखापत झाल्याचा फोटो शेअर केला आहे. 

  


स्पॉट बॉयच्या वृत्तनुसार मौनीच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मौनी ठिक आहे.  

सध्या मौनी तिचा आगामी सिनेमा 'रोमियो अकबर वॉल्टर'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती जॉन अब्राहमचा अपोझिट दिसणार आहे. 'गोल्ड' रिलीजपूर्वीच मौनीने अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ साईन केला होता. सध्या मौनीच्या झोळीत रिलीजचे चार सिनेमा आहे. मौनी लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बोले चूडिया’ या सिनेमातसुद्धा दिसणार आहे. आणि श्रद्धा कपूर या दोघींच्या नावांची चर्चा होती. पण सोना व श्रद्धा दोघींनाही मात देत मौनीने बाजी मारली.

‘देने वाला जब भी देता है छप्पर फाड कर देता है,’ अशी एक हिंदीतले म्हण तूर्तास तरी मौनी रायला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. गेल्या काही दिवसांपासून ती ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबतच्या अफेअरमुळे देखील चर्चेत आहे. 


Web Title: Mouni roy hospitalised kokilaben ambani hospital due to her elbow pain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.