ती रागावली की अगदी भांडीही फेकून मारायची...;  आई तनुजाबद्दल काजोलचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:50 PM2021-09-23T12:50:16+5:302021-09-23T12:56:27+5:30

लहानपणी काजोल प्रचंड खोडकर होती. पण आई तनुजा कडक शिस्तीची होती. तिनं काजोलला बिघडू दिलं नाही. आज काजोल हे अभिमानानं सांगते...

mother tanuja had beaten me up with a badminton racket, dishes says Kajol | ती रागावली की अगदी भांडीही फेकून मारायची...;  आई तनुजाबद्दल काजोलचा खुलासा

ती रागावली की अगदी भांडीही फेकून मारायची...;  आई तनुजाबद्दल काजोलचा खुलासा

Next
ठळक मुद्देआई-वडिलांच्या वेगळं होण्यावरही काजोल या मुलाखतीत बोलली होती.

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री काजोल ( Kajol) काहीशी गर्विष्ठ वाटत असली तरी स्वभावानं अगदीच खोडकर. लहानपणी तर काजोल प्रचंड खोडकर होती. पण आई तनुजा (Tanuja ) कडक शिस्तीची होती. तिनं काजोलला बिघडू दिलं नाही. आज काजोल हे अभिमानानं सांगते. एका जुन्या मुलाखतीत खुद्द काजोलने हा खुलासा केला होता.
तनुजा किती कडक शिस्तीच्या होत्या, हे काजोलने जे काही सांगितलं त्यावरून तुम्हालाही पटेल.

काजोलनं सांगितलं होतं की, ‘माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम होतं. पण या प्रेमामुळे तिनं मला बिघडू दिलं नाही. ती अतिशय कडक शिस्तीची होती आणि आजही तशीच आहे. लहान मुलांना मारलं नाही तर मुलं बिघडतात, असं तिचं ठाम मत होतं. त्यामुळे अनेकदा मी खोड्या केल्या की  माझी आई मला बॅडमिंटन रॅकेटनं मारायची. अगदी हातात जे मिळेल ते फेकून मारायची. कित्येकदा तिने मला भांडीही फेकून मारली आहेत.’ 
  ‘ माझ्या 13 व्या वाढदिवशी मात्र तिलं मला अतिशय प्रेमानं जवळ घेतलं आणि मी यापुढे तुझ्यावर हात उचलणार नाही. पण तू काही चुकीचं करत आहेस, असं वाटलं तर माझा नाईलाज असेल, असं तिनं अतिशय प्रेमानं सांगितलं. आता तू मोठी झाली आहेस. तुला तुझ्या जबाबदाºयांची जाणीव हळूहळू होतेय,. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे,असं ती मला म्हणाली. आजही तो दिवस मला आठवतो, असेही काजोलने या मुलाखतीत सांगितलं होतं.

आई-वडिलांच्या वेगळं होण्यावरही बोलली...
आई-वडिलांच्या वेगळं होण्यावरही काजोल या मुलाखतीत बोलली होती. ती म्हणाली होती,‘ मी साडेचार वर्षांची असेल तेव्हा माझे आई-वडील विभक्त झाले. यात चुकीचं नव्हतं. कारण माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींचे आई-वडील एकत्र होते. पण त्यांच्या नात्यामध्ये दुरावा होता, हे मी बघत होते.  आई आणि वडील एकत्र होते, तेव्हाही माझं त्यांच्यावर प्रेम होतं. ते विभक्त झाल्यावरही मी त्यांच्यावर प्रेम करत होते.’ 

Web Title: mother tanuja had beaten me up with a badminton racket, dishes says Kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app