ठळक मुद्देमिलिंद सोमन भारताच्या सुपरमॉडेल्सपैकी एक आहे. मिलिंदने स्वत:पेक्षा 26 वर्षांनी लहान अंकिता कंवरसोबत लग्न केले, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

मिलिंद सोमणच्या ‘न्यूड रन’वरून अलीकडे वादंग उठले होते. मिलिंद सोमणने 4 नोव्हेंबर रोजी आपला 55 वा वाढदिवस साजरा केला.  फिटनेससाठी ओळखल्या जाणा-या मिलिंदने गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. मात्र, धावताना त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो पूर्ण नग्नावस्थेत धावला. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार हिने त्याची ही छबी कॅमे-यात टिपली होती. यानंतर मिलिंदने  त्याचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या न्यूड फोटोवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर खरपूस टीका झाली होती. याच मिलिंदवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. कारणही तितकेच खास आहे. होय, न्यूड फोटोनंतर आता मिलिंद एका पुरातन शिवमंदिराच्या रस्त्यावरचा कचरा वेचताना दिसला. त्याच्या या कृतीचे सर्वांनी कौतुक केले आहे.

मिलिंद, त्याची आई उषा आणि पत्नी अंकिता यांनी नुकतीच एका पुरातन शिव मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या वाटेवर मिलिंदला बराच कचरा पडलेला दिसला. मिलिंदने काय करावे, तर वाटेवरचा हा सर्व कचरा गोळा केला. याचे फोटोही त्याने शेअर केलेत.

हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले, ‘आज शिवमंदिराच्या छोट्या ट्रॅकवर अंकिता व आईसोबत. हा प्रवास आणखी मजेदार बनवण्यासाठी आणि देवाला आणखी सन्मान देण्यासाठी मी रस्त्यावरचा कचरा मी गोळा केला. केअरटेकरने सांगितले की, डस्टबिनमधील काडीकचरा माकडं बाहेर फेकून देतात. त्यामुळे इथे डस्टबिन नाही. सगळा कचरा जंगल्यात जाळला जातो. माझ्या मते, आता माकडांपेक्षा अधिक स्मार्ट बनण्याची वेळ आली आहे. फूड कंपन्यांना आता बायोडिग्रेडेबल पॅकेजिंगची सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून अधिकाधिक लोक कुठल्याही अपराधी भावनेशिवाय जंक खाऊ शकतील. ’

उम्र 55 की और...! मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोवर शेखर सुमन यांचा टोला

पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा

लोकांनी केले कौतुक
मिलिंदने हे फोटो व पोस्ट शेअर करताच, चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. चांगले काम, तू नेहमीच प्रेरित करतो, असे एका युजरने लिहिले. तुमच्याबद्दलचा आदर व प्रेम आणखी वाढलेय, असे लिहित मिलिंदच्या या कृतीचे कौतुक केले.

मिलिंद सोमण भारताच्या सुपरमॉडेल्सपैकी एक आहे. मिलिंदने स्वत:पेक्षा 26 वर्षांनी लहान अंकिता कंवरसोबत लग्न केले, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 2018 मध्ये अंकिता व मिलिंद यांनी लग्न केले,त्यावेळी मिलिंद 52 वर्षांचा तर अंकिता 26 वर्षांची होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: milind soman treks to shiva temple with wife ankita konwar and mother usha oman and picks garbage on his way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.