उम्र 55 की और...! मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोवर शेखर सुमन यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 10:24 AM2020-11-08T10:24:48+5:302020-11-08T10:25:48+5:30

अंकिताने शेअर केला आणखी एक फोटो

shekhar suman reaction on milind soman nude photo | उम्र 55 की और...! मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोवर शेखर सुमन यांचा टोला

उम्र 55 की और...! मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोवर शेखर सुमन यांचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम पांडे हिच्याविरुद्ध अश्लील व्हिडीओ प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर आता मॉडेल मिलिंद सोमण यांच्याविरूद्ध कोलवा पोलीस ठाण्यात असाच गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

गोव्यातील समुद्र किना-यावर न्यूड होऊन धावणे अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण याला महाग पडले. याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तूर्तास मिलिंदच्या या न्यूड फोटो कॉन्ट्रोव्हर्सीवर अभिनेता शेखर सुमनने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. ‘मिलिंद सोमण... उम्र 55 की और हरकते बचपन की...,’ असे शेखर सुमन यांनी मिलिंदच्या या न्यूड फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे.

शेखर सुमनने या ट्विटमधून मिलिंदला जोरदार टोला लगावला आहे. त्याच्या या ट्विटवर नेटक-यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने शेखर सुमनच्या ट्विटवर तितकीच मजेदार कमेंट केली आहे. ‘अरे सर, आदमी जब बुढा होता तब बच्चा बन जाता आहे. ऐसे सुना है की, बॉलिवूड में कोई बुढा और बुढी नहीं होते,’ असे या युजरने लिहिले आहे. एका युजरने ‘आपको टक्कर दे रहा है सर,’ अशी कमेंट केली आहे.

एका युजरची प्रतिक्रिया आणखीच मजेशीर आहे. ‘जंगल जंगल पता चला है, चड्डी भुलके सोमन खीला है,’ असे या युजरने लिहिले आहे.

रात्री उशिरा गुन्हा दाखल

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम पांडे हिच्याविरुद्ध अश्लील व्हिडीओ प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. यानंतर आता मॉडेल मिलिंद सोमण यांच्याविरूद्ध कोलवा पोलीस ठाण्यात असाच गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला. मिलिंद सोमण यांनी आपल्या ५५ व्या वाढदिवशी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर एक स्वत:चा विवस्त्रावस्थेत धावतानाचा फोटो अपलोड केला होता. त्यांचा हा फोटो गोव्यातील वार्का समुद्रकिनारी काढण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी मिलिंद सोमण यांच्या विरुद्ध भादंसंच्या २९४ व आयटी कायद्याच्या ६७ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकिताने शेअर केला आणखी एक फोटो

न्यूड फोटो पोस्ट केल्याप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर मिलिंदची वाईफ अंकिता हिने आणखी एक फोटो पोस्ट केला. अर्थात हे फोटो क्लोज शॉट आहेत. यात मिलिंद शर्टलेस दिसतोय तर अंकिता स्विमसूटमध्ये आहे. हा फोटो पोस्ट करताना अंकिताने त्याला दिलेले कॅप्शन खास आहे. ‘ऑलवेज ब्राऊन अ‍ॅण्ड प्राऊड, माय डोज ऑफ व्हिटॅमिन डी,’ असे तिने लिहिले आहे.

मिलिंद सोमन भारताच्या सुपरमॉडेल्सपैकी एक आहे. मिलिंदने स्वत:पेक्षा 26 वर्षांनी लहान अंकिता कंवरसोबत लग्न केले, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 2018 मध्ये अंकिता व मिलिंद यांनी लग्न केले,त्यावेळी मिलिंद 52 वर्षांचा तर अंकिता 26 वर्षांची होती.

Web Title: shekhar suman reaction on milind soman nude photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.