OMG! मिलिंद सोमनने काय केले पाहा...; चक्क कियारा अडवाणी ‘त्या’ टॉपलेस फोटोची केली कॉपी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:57 AM2020-07-21T11:57:36+5:302020-07-21T11:58:27+5:30

मिलिंदचा फोटो पाहून अनेकांना अभिनेत्री कियारा अडवाणीच्या टॉपलेस फोटोची आठवण झाली.

milind soman shared bare chested photo fans compared it to kiara advani photoshoot | OMG! मिलिंद सोमनने काय केले पाहा...; चक्क कियारा अडवाणी ‘त्या’ टॉपलेस फोटोची केली कॉपी!!

OMG! मिलिंद सोमनने काय केले पाहा...; चक्क कियारा अडवाणी ‘त्या’ टॉपलेस फोटोची केली कॉपी!!

googlenewsNext
ठळक मुद्देकियाराने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूटची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती.

मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमण सध्या पत्नी अंकितासोबत लोणावळ्यात मज्जा करतोय. याचदरम्यान मिलिंदने त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आणि बघता बघता हा फोटो तुफान व्हायरल झाला. मिलिंदचा हा फोटो पाहून अनेकांना अभिनेत्री कियारा अडवाणीच्या टॉपलेस फोटोची आठवण झाली.
मिलिंद या फोटोत झाड्यांच्या पानांआड उभा आहे. तो शर्टलेस आहे.‘दरवेळी थोडा थोडा बदल करतोय. वेळेप्रमाणे  शरीर, मेंदू, अ‍ॅडीड्युड, विचार बदलत असतात. जे आपण ऐकतो, वाचतो, खातो आणि पाहतो त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. स्वत:वर प्रेम करा, सकारात्मक राहा’, असे कॅप्शन मिलिंदने या फोटोला दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी कियाराचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. डब्बू रत्नानीसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये कियाराने पानाआड लपून टॉपलेस पोज दिली होती.

 मिलिंदचा हा फोटो पाहून चाहत्यांनी त्याची तुलना कियारासोबत केली. मग काय सोशल मीडियावर कमेंट्स जणू पाऊस पडला. ‘तू पण डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट करतोय का? काय तू कियारा अडवाणीला कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय? असे अनेक सवाल करत चाहत्यांनी मिलिंदची मजा घेतली.


  कियाराने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूटची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. कियाराचा हा टॉपलेस फोटो तुफान व्हायरल झाला होता. यावरचे मीम्सही व्हायरल झाले होते.  आता तसाच फोटो मिलिंदने शेअर केला म्हटल्यावर नेटकºयांना आयती संधी मिळाली.

 

Web Title: milind soman shared bare chested photo fans compared it to kiara advani photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.