मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. सध्या ही जोडी एका रोमँटिक व्हेकेशनवर आहे. साहजिकच या व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.  

सध्या हे कपल आईसलँडच्या ब्लू लगूनमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. नुकतात त्यांचा हॉट फोटो समोर आला आहे. थंड वाफा निघणाऱ्या पुलाच्या पाण्यात हे दोघे एन्जॉय करतानाचा हॉट व सेक्सी फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.


मिलिंद व अंकिताचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मिलिंदने हा फोटो स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


 मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. मिलिंद त्याची पत्नी अंकिता कुंवरसोबतच्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत येत असतो. त्या दोघांमधील वयाच्या अंतरामुळे मिलिंदला बऱ्याचदा ट्रोल केलं जातं.  


फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारा मिलिंद सोमण बऱ्याचदा लोकांना फिटनेसचे टीप्स देत असतो. मागील वर्षी तो फोर मोर शॉट्स प्लीझ, शॉर्ट फिल्म मुक्ती व बाजीराव मस्तानी चित्रपटात अंबाजी पंतच्या भूमिकेत दिसला होता.

अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. आम्हा दोघांसाठीही वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता व मिलिंद म्हणाले होते.  


Web Title:  Milind and Ankita's romance even in cold water at 3 degrees Celsius, see their hot photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.