metoo model paula accused sajid khan of sexual harassment when she was 17 year old | त्याने स्पर्श केला, कपडे उतरविण्यास सांगितले...! भारतीय मॉडेलने साजिद खानवर केला गंभीर आरोप

त्याने स्पर्श केला, कपडे उतरविण्यास सांगितले...! भारतीय मॉडेलने साजिद खानवर केला गंभीर आरोप

ठळक मुद्देमहिला पत्रकार, एक सहाय्यक दिग्दर्शक आणि दोन अभिनेत्रींनी साजिदवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.

2018 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सुरु केलेल्या ‘मीटू’ मोहिमेने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले होते. या मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्री, मॉडेलनी आपबीती सांगत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते़. दिग्दर्शक साजिद खान यापैकी एक. साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. आता भारतीय मॉडेल पाऊला हिनेही  आपले मौन सोडले असून दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप लावले आहेत. ‘मी 17 वर्षांची असताना साजिद खानने काम देण्याच्या बहाण्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला होताच अशा आशयाची पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्रामवर केली आहे. तिच्या या आरोपाने पुन्हा एकदा ‘मीटू’ मोहिम चर्चेत आली आहे.

म्हणून त्यावेळी मी गप्प राहिले...

पाउलाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘ मीटू चळवळीदरम्यान मी गप्प राहिले कारण या इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नव्हता आणि मला माझ्या कुटूंबासाठी काम करणे जरुरी  होते. मात्र आता माझे आईवडिल माझ्यासोबत नाहीत. म्हणून मी साजिद खान याच्याविरोधात बोलू शकते. मी 17 वर्षांची असताना त्यांनी माझा लैंगिक छळ केला होता.  त्यावेळी साजिद खानचा ‘हाऊसफुल’ चित्रपट येणार होता. या चित्रपटात काम मिळविण्यासाठी मी त्यांच्याकडे गेली असता त्याने माझ्याशी अश्लील भाषेत संभाषण केले. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मला कपडे उतरविण्यासा सांगितले. देवालाच माहित असेल असे त्याने किती मुलींसोबत केले असेल.’

  ‘मला हे सांगण्यासाठी कोणी बाध्य केलेले नाही. ही गोष्ट जगासमोर यावी, म्हणून आज मी यावर बोलतेय. तेव्हा मी लहान होते. मात्र आता मी गप्प नाही बसणार. साजिद खानला जेल झाली पाहिजे, अशी मागणीही पाउलाने केली आहे. केवळ कास्टिंग काऊचसाठीच नाही तर लोकांना फसवण्यासाठीही...’,अशी मागणीही पाउलाने केली आहे.

#MeToo: १०० कोटी मिळाले तर कुत्र्यासोबत सेक्स करशील का? साजिद खानच्या ‘या’ प्रश्नाने शॉक्ड झाली होती अहाना कुमरा

#MeToo: दिया मिर्झा म्हणते, साजिद खान हा अतिशय सेक्सिस्ट आणि वात्रट माणूस

साजिद खानवर अनेकींनी केला होता गैरवर्तनाचा आरोप
महिला पत्रकार, एक सहाय्यक दिग्दर्शक आणि दोन अभिनेत्रींनी साजिदवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.  अभिनेत्री दिया मिर्झा आणि बिपाशा बासू यांनीही साजिदची महिलांशी वागणूक कशी आहे हे सांगितले होते. साजिदने मात्र स्वत:वरचे हे आरोप खोडून काढले होते. याच पार्श्वभूमीवर साजिदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. विशीत असताना मुलींना, महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याचे आणि बरेच अफेअर्स होते अशी कबुली साजिदने या व्हिडीओत दिली होती़े. बडा कमीना आदमी था अशी स्वत:ची संभावना त्याने या व्हिडीओत केली आहे. तिशीत दिग्दर्शनावर लक्ष केंद्रीत केल्यावर कामामुळे मुलींकडे आकर्षित झालो नसल्याची सारवासारव करण्याचाही त्याने प्रयत्न केला होता.

#MeToo : माझ्या भावाने असे काही केले असे तर त्याला भोगावेच लागेल- फराह खान

अनेकांवर झाला होता आरोप
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेने वेग घेतला  होता. इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या अनेक प्रकरणांना तोंंड फुटले होते़ नाना पाटेकर, दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद, साजिद खान यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झाले होते.  बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ अर्थात आलोक नाथ यांच्यावरही बलात्काराचा आरोप झाला होता. पटकथा लेखिका आणि दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी कथितरित्या आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.  २० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या एका ‘संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केला होता, अशी पोस्ट विनता यांनी लिहिली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: metoo model paula accused sajid khan of sexual harassment when she was 17 year old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.