Mera Intezaar Karna Song From Khuda Haafiz Movie Starring Vidyut Jammwal And Shivaleeka Oberoi | 'खुदा हाफिज' सिनेमाचे दुसरे गाणे आले समोर, या तारखेला होणार प्रदर्शित

'खुदा हाफिज' सिनेमाचे दुसरे गाणे आले समोर, या तारखेला होणार प्रदर्शित

अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांचा सिनेमा खुदा हाफिज मध्ये दोघांची वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता सिनेमाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. मेरा इंताजर करना गाण्याने रसिकांची अधिक पसंती मिळवली आहे. मुळात हे गाणे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे ही ही या गाण्याचे खास वैशिष्ट म्हणावे लागले.  

मधुर  आणि हृदयस्पर्शी शब्दांच्या रचनेमुळे  हे गाणे प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर हिट ठरत आहे. सिनेमात विद्युत जामवालचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. हे गाणे सिनेमात असलेले प्रसंग आणि कठिण प्रसंगी सामोरे जाण्याची ताकद दर्शवते. वास्तविक जीवनातील घटनांनी प्रेरित हा चित्रपट एक रोमँटिक एक्शन थ्रिलर आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन फारुख कबीर यांनी केले आहे. 

डिस्ने + हॉटस्टार मल्टिप्लेक्स अंतर्गत प्रदर्शित होणारा 'खुदा हाफिज' हा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात विद्युत जामवाल, शिवालिका ओबेरॉय, अन्नू कपूर, अहाना कुमरा आणि शिवा पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खुदा हाफिज 14 ऑगस्ट 2020 रोजी डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज होणार आहे. विद्युत जामवाच्या चाहत्यांसाठी त्याचा सिनेमा मनोरंजनाची ट्रीट ठरणार हे मात्र नक्की, त्यामुळे रसिकांमध्येही कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mera Intezaar Karna Song From Khuda Haafiz Movie Starring Vidyut Jammwal And Shivaleeka Oberoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.